September 9, 2024 2:30 PM

प्रधानमंत्री येत्या २९ सप्टेंबरला मन की बात कार्यक्रमाद्वारे श्रोत्यांशी साधणार संवाद 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या २९ सप्टेंबरला आकाशवाणीवरुन मन की बात कार्यक्रमाद्वारे  देश-विदेशातल्या श्रोत्यांशी संवाद  साधणार  आहेत. या कार्यक्रमाचा हा ११४ वा भाग असेल.  या कार्यक्रमासाठी  आपल्या  कल्पना आणि सूचना  १८००-११-७८०० या टोल फ्री क्रमांकावर २७ सप्टेंबरपर्यंत  देता येतील. तसंच माय  जीओव्ही  संकेतस्थळावरून देखील सूचना  पाठवता  येतील.  हा कार्यक्रम २९ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता आकाशवाणी आणि दूरदर्शनवरुन  प्रसारित  करण्यात  येईल.

August 25, 2024 12:57 PM

विकसित भारताचं लक्ष्य साध्य करण्यासाठी समर्पणाच्या भावनेची गरज – प्रधानमंत्री

  देशाच्या स्वातंत्र्यासाठी, राजकीय पार्श्वभूमी नसतानाही अनेकांनी स्वातंत्र्यलढ्यात स्वतःला झोकून दिलं, विकसित भारताचं लक्ष्य साध्य करण्यासाठी आज अशाच भावनेची गरज आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.   प्रधानमंत्र्यांनी आज आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधला. हा या कार्यक्रमाचा ११३वा भाग होता.    आज  मोठ्य़ा संख्येनं युवा राजकारणात यायला तयार आहेत, त्यांना केवळ योग्य मार्गदर्शन आणि योग्य संधीची गरज आहे असं त्यांनी सांगितलं. युवा वर्गान या अभ...

August 23, 2024 1:46 PM

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी २५ ऑगस्टला ‘मन की बात’ कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा ११३ वा भाग असेल.

August 12, 2024 3:50 PM

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या २५ तारखेला ‘मन की बात’ मधून देशवासियांशी साधणार संवाद

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या महिन्याच्या २५ तारखेला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून ‌देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ११३ वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरीकांनी आपल्या सूचना आणि विचार येत्या २३ तारखेपर्यंत १८००-११-७८०० या नि:शुल्क क्रमांकावर, नरेंद्र मोदी ॲप वर किंवा माय जीओव्ही ओपन फोरमवर नोंदवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

July 1, 2024 1:20 PM

लोकसभा निवडणुकीत देशातल्या मतदारांनी संविधान आणि लोकशाही व्यवस्थेवरच्या अढळ विश्वासाचं दर्शन घडवलं – प्रधानमंत्री

लोकसभा निवडणुकीत देशातल्या मतदारांनी संविधान आणि लोकशाही व्यवस्थेवरच्या अढळ विश्वासाचं दर्शन घडवल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमाच्या एकशे अकराव्या भागात ते काल बोलत होते. जगातली सर्वात मोठी सार्वत्रिक निवडणूक यशस्वीपणे पार पडल्याबद्दल त्यांनी निवडणूक यंत्रणा आणि मतदारांचं अभिनंदन केलं तसंच देशवासीयांचे आभार मानले. जगभरात भारतीय संस्कृती गौरवली जात असल्याचं सांगताना त्याबाबतची अनेक उदाहरणं प्रधानमंत्र्यांनी मन की बात या कार्यक्रमात दिली. दह...

June 29, 2024 8:15 PM

प्रधानमंत्री उद्या ‘मन की बात’ कार्यक्रमातून देशवासीयांशी साधणार संवाद

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या रविवारी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेच्या तिसऱ्या आवृत्तीचा हा पहिला भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल. समाजमाध्यमांवरही हा कार्यक्रम ऐकता येईल.