July 14, 2024 6:59 PM

पुरी इथल्या भगवान जग्गनाथाचे रत्नभंडार ४६ वर्षांनंतर पुन्हा खुले

ओदिशातल्या भगवान जगन्नाथांचं रत्नभांडार उघडण्याची प्रक्रिया आज दुपारी सुरू झाली. ही संपूर्ण प्रक्रिया सरकारने आखून दिलेल्या मानकांनुसार पार पडली असून तिचं व्हिडीओ चित्रीकरण करण्यात आलं आहे. रत्नभांडारात दुर्मीळ दागिने, रत्नं, सोनं यांचा समावेश आहे. हा मौल्यवान ऐवज ठेवलेल्या पेट्या कडेकोट सुरक्षा व्यवस्था असलेल्या खोलीत तात्पुरत्या स्वरुपात ठेवल्या आहेत. या ऐवजाची मोजदाद करण्यात येईल. हे रत्नभांडार यापूर्वी १९८५ मध्ये उघडण्यात आलं होतं, तर यातल्या मौल्यवान वस्तूंची मोजदाद शेवटची १९७८ मध्ये झाली ह...

July 9, 2024 11:33 AM

भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र, देवी सुभद्रा यांचे तीन रथ पुरीच्या श्री गुंडीचा मंदिरात पोहोचले

भगवान जगन्नाथाचा - नंदीघोष, देवी सुभद्रा आणि भगवानसुदर्शन यांचा - देवदालन आणि भगवान बलभद्राचा - तालध्वज हे तीन रथ काल पुरीच्या रस्त्यावर सूर्यास्त झाल्यावर प्रथेनुसार जागेवरच थांबवण्यात आले. आज तिथूनच त्यांच्या मावशी- देवी गुंडीच्या देवीच्या मंदिरात असंख्य भाविक हे रथ पुन्हा पुढे ओढून नेतील. या पवित्र रथयात्रेचे साक्षीदार होण्यासाठी जगभरातून लाखोभाविक पुरीमध्ये आले आहेत. या वर्षी विशिष्ट खगोलीय रचनेमुळे यंदाची रथयात्रा दोन दिवसांसाठी आयोजित केली आहे. यापूर्वी 1971मध्ये हा दुर्मिळ योग आला होता. र...