August 8, 2024 3:58 PM

लोकसभेत वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक सादर

लोकसभेत आज वक्फ (दुरुस्ती) विधेयक २०२४ अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी सादर केलं. यात वक्फ कायदा १९९५ मध्ये सुधारणा करुन राज्य वक्फ बोर्डांचे अधिकार आणि कार्यप्रणाली तसंच वक्फ मालमत्तेची नोंदणी आणि सर्वेक्षणाशी संबंधित समस्यांचं निराकरण करण्याचा प्रयत्न असल्याचं रिजिजू यांनी सांगितलं. अल्पसंख्याकांना न्याय देण्यासाठी हा कायदा आणण्यात आल्याचं सरकारनं म्हटलं आहे. काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरच्चंद्र पवार पक्षानं या विधेयकाला विरोध केला असून सर्वपक्षीय बैठक बोलाव...

August 7, 2024 3:37 PM

लोकसभेत २०२४ च्या अर्थ विधेयकावर चर्चा

लोकसभेत आज २०२४साठीच्या अर्थ विधेयकावरच्या चर्चेला पुन्हा सुरुवात झाली. अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज संध्याकाळी या चर्चेला उत्तर देण्याची शक्यता आहे. दरम्यान, या वर्षीच्या अर्थंसंकल्पातली ध्येयं साध्य करण्यासाठी हे अर्थविधेयक मदत करेल, असा विश्वास या चर्चेदरम्यान भाजपच्या खासदार जगदंबिका पाल यांनी व्यक्त केला. काँग्रेसचे मुहम्मद हमदुल्ला सयीद यांनी अर्थ विधेयकाला विरोध केला. हे सरकार कॉर्पोरेट कंपन्यांना करात अधिक सवलत देत असून सामान्य नागरिकांवरचा कर वाढवत असल्याचा आरोप त्यांनी केला. ही चर्चा ...

August 5, 2024 1:06 PM

लोकसभेत आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाच्या अखत्यारितल्या 2024-25 साठीच्या अनुदानाच्या मागण्यांवर चर्चा

लोकसभेत आज आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाच्या अखत्यारितल्या 2024-25 साठीच्या अनुदानाच्या मागण्यांवर चर्चा होईल. गोव्याच्या विधानसभेत अनुसूचित जमातींचं प्रतिनिधीत्व सुधारण्याबाबतचं विधेयकही सादर होणं अपेक्षित आहे. राज्यसभेत तेलक्षेत्र नियमन आणि विकास सुधारणा विधेयक सादर होणार असून कृषी मंत्रालयाच्या कामकाजाबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे.  

July 26, 2024 8:12 PM

लोकसभेत आज अर्थसंकल्पावर चर्चा

लोकसभेचं कामकाज आज २०२४-२५ साठीच्या अर्थसंकल्पावरच्या चर्चेनं सुरु झालं. चर्चेत भाग घेताना भाजपाचे जुगल किशोर म्हणाले की, हा अर्थसंकल्प आर्थिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून महत्वाचा असून, तो जनतेसाठी फायद्याचा ठरेल.    प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात सरकार देशाला स्वावलंबी बनवण्याचे सातत्यपूर्ण प्रयत्न करत असल्याचं पंचायती राज मंत्री राजीव रंजन सिंह म्हणाले. हा अर्थसंकल्प बिहार आणि आंध्र प्रदेश केंद्रित असल्याचा विरोधकांचा दावा त्यांनी फेटाळून लावल...

July 25, 2024 8:14 PM

यंदाच्या अर्थसंकल्पात पंजाबवर अन्याय झाला आहे – चरणजित सिंह चन्नी

लोकसभेत आज केंद्रीय अर्थसंकल्पावरची चर्चा सुरु राहिली. अर्थसंकल्पानं जनतेची घोर निराशा केली असून, यामध्ये पंजाबवर अन्याय झाल्याचा आरोप काँग्रेसचे चरणजित सिंह चन्नी यांनी यावेळी केला. पुरामुळे प्रभावित झालेल्या पंजाबच्या जनतेसाठी अर्थसंकल्पात काहीच तरतूद नसल्याचं ते म्हणाले. या टीकेला उत्तर देताना, महाराष्ट्राचा सर्वाधिक विकास एनडीए सरकारच्या काळात झाल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांनी सांगितलं.   हा अर्थसंकल्प केवळ कॉपी-पेस्ट अशा स्वरूपाचा असून, अलीकडच्या काळातला सर्वात जास्त फू...

June 21, 2024 9:51 AM

लोकसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून भर्तृहरी महताब यांची नियुक्ती

भाजपाचे खासदार भर्तृहरी महताब यांची लोकसभेच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ही नियुक्ती केली असल्याची माहिती, केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू यांनी समाज माध्यमावरील संदेशाद्वारे दिली आहे. लोकसभेच्या अध्यक्षांची निवड होईपर्यन्त, महताब अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडतील असं रिजिजू यांनी संदेशात म्हंटलं आहे.   सदस्यांना शपथ घेण्याच्या कामी हंगामी अध्यक्षांना मदत करण्यासाठी घटनेच्या कलम 99 अन्वये सुरेश कोडीकुन्नील, टी बालु, राधा मोहन सिंग,...