July 5, 2024 7:35 PM
विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी १२ उमेदवार रिंगणात
विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी मतदान होणार हे आज स्पष्ट झालं. अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी कुणीही अर्ज मागे न घेतल्यानं ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात आहेत. आता १२ जुलै रोजी मतदान होऊन त्याचदिवशी सायंकाळी मतमोजणी होणार आहे. भाजपकडून पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर आणि अमित गोरखे रिंगणात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे, शिवसेनेकडून माजी खासदार कृपाल तुमाणे आणि भावना गवळी, काँग्रेसकडून प्रज्ञा सातव निवडणूक लढवत आहेत....