September 26, 2024 8:44 PM

इस्रायलने लेबननमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात ६०० पेक्षा जास्त जण ठार

इस्रायलने लेबननमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात सहाशे पेक्षा जास्त जण ठार झाले आहेत. हिजबुल्लाहने इस्रालवर क्षेपणास्त्राचा मारा करत या हल्ल्याला प्रत्युत्तर दिलं आहे. अमेरिका, फ्रान्स आणि मित्र राष्ट्रांनी इस्रायल-लेबनन सीमेवर २१ दिवसांचा युद्धविराम घ्यावा, अशी मागणी केली आहे. अमेरिका, फ्रान्ससह युरोपियन युनियन, जर्मनी, सौदी अरेबिया, कतर आणि संयुक्त अरब अमिराती यांनी हे निवेदन केलं आहे. तर इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष बेंजामीन नेत्यानाहू यांच्या कार्यालयानं इस्रायल संरक्षण दलाला अधिक जोमाने लढण्याचे निर...

September 26, 2024 2:37 PM

हिजबुल्लाह आणि इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांनी लेबननमध्ये प्रवास न करण्याचं बैरुतमधल्या भारतीय दुतावासाचं आवाहन

हिजबुल्लाह आणि इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांनी लेबननमध्ये प्रवास न करण्याचं आवाहन बैरुतमधल्या भारतीय दुतावासाने केलं आहे. पश्चिम आशियाई देशात प्रवास करू नये आणि लेबनन तात्काळ सोडावं असंही भारतीय दुतावासाने म्हटलं आहे. ज्यांना तिथं राहणं आवश्यक आहे त्यांनी आवश्यकता नसेल तर बाहेर पडू नये असंही दुतावासाने म्हटलं आहे. दरम्यान, इस्रायलने लेबननमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात ५५८ जणांचा मृत्यू झाला असून अठराशे जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये ५० बालकांचा समावेश आहे.

September 23, 2024 8:24 PM

लेबननमध्ये आज सकाळपासून इस्रायलनं केलेल्या हल्ल्यांमध्ये किमान १८२ जण ठार

लेबननमध्ये आज सकाळपासून इस्रायलनं केलेल्या हल्ल्यांमध्ये किमान १८२ जण ठार झाले असून ७२७ जण जखमी झाले आहेत. यात बालकं, महिला, आणि आरोग्यसेवकांचा समावेश असल्याचं लेबननच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं. लेबननमधल्या ३०० ठिकाणांवर हल्ले केल्याची माहिती इस्रायली सैन्यानं दिली आहे.    दुसऱ्या बाजूला, हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेनं इस्रायलच्या उत्तर भागातल्या लष्करी तळांवर आणि रसद गोदामांवर क्षेपणास्त्र डागली आहेत. इस्रायलनं केलेल्या हवाई हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हा हल्ला केल्याचं हिजबुल्लाहनं म...

September 21, 2024 2:26 PM

लेबनॉनमध्ये सक्रीय असलेल्या हेजबोल्ला दहशतवादी संघटनेचा म्होरक्या इब्राहिम अकील इस्रायलच्या हवाई हल्ल्यात ठार

लेबनॉनमध्ये सक्रीय असलेल्या हेजबोल्ला या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या इब्राहिम अकील इस्रायलच्या हवाई हल्ल्यात ठार झाल्याच्या बातमीवर हेजबोल्लानं शिक्कामोर्तब केलं आहे. दाहियेह भागात इस्रायलनं केलेल्या हवाई हल्ल्यात किमान १४ जण ठार, तर ६६ जण जखमी झाल्याची माहिती लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयानं दिली. दाट लोकसंख्येच्या भागात इस्रायलनं केलेल्या या कारवाईचा लेबनॉनचे प्रधानमंत्री नजीब मिकाती यांनी निषेध केला आहे. प्रत्युत्तरादाखल हेजबोल्लानं इस्रायलच्या दिशेनं शंभरपेक्षा जास्त क्षेपणास्त्रं डागली. या हल्...

September 19, 2024 1:06 PM

लेबननमध्ये झालेल्या स्फोटात 32 जणांचा मृत्यु

मंगळवारी आणि बुधवारी लेबननमध्ये झालेल्या स्फोटात किमान ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. बैरुत आणि इतर ठिकाणी पेजर आणि वॉकी-टॉकीमध्ये हे स्फोट झाले. हिजबुल्ला ही उपकरणं वापरत होती. परवा पेजरच्या स्फोटात १२ जणांचा मृत्यू आणि सुमारे ३ हजार जण जखमी झाले होते. या स्फोटातल्या मृतांवर अंत्यसंस्काराच्या ठिकाणी काल वॉकी टॉकीच्या स्फोटात २० जण ठार झाले आणि साडे चारशे जण जखमी झाले होते.   पेजरची निर्मिती केलेल्या तैवानी आणि हंगेरीच्या कंपनीने यात कुठलाही सहभाग नसल्याचं स्पष्ट केलंय. या हल्ल्यामागे इस्राइलचा...