July 23, 2024 8:45 PM

इथियोपिया : भूस्खलानात १५५ जणांचा मृत्यू

इथियोपिया इथं भूस्खलानामुळे झालेल्या मृतांची संख्या १५५ झाली आहे. इथिओपियामधल्या गेझे गोफा जिल्ह्यात काल सकाळी हे भूस्खलन झालं होतं. आतापर्यंत महिला आणि बालकांचे मिळून ५५ मृतदेह सापडले असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याचं स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितलं. इथियोपियामध्ये सध्या पावसाळा सुरू असून सततच्या पावसामुळे पूर्व आफ्रिकन देशांमध्ये भूस्खलनाच्या घटना अनेकदा घडत असतात.

July 12, 2024 1:41 PM

नेपाळमध्ये भूस्खलनामुळे दोन बस नदीत वाहून गेल्या

नेपाळमध्ये भूस्खलन झाल्यामुळे दोन प्रवासी बस आज पहाटे साडे तीन वाजण्याच्या नदीत वाहून गेल्या. दोन्ही बसमध्ये एकूण ६५ प्रवासी होते, यात ७ भारतीय नागरिकांचा समावेश आहे. चितवन जिल्ह्यात नारायणघाट - मुगलिंग पट्ट्यात भूस्खलन झाल्यामुळे या बस त्रिशूली नदीत पडल्या.  यातल्या बीरगंजहून काठमांडूला चाललेल्या बसमध्ये ७ भारतीय प्रवास करत होते. नेपाळच्या सशस्त्र पोलीस दलानं घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरु केलं असून प्रधानमंत्री पुष्पकमल दहल यांनी आवश्यक ती सर्व कार्यवाही तातडीनं करण्याचे निर्देश दिले आहेत.