August 19, 2024 10:43 AM
भारत आणि कुवेत यांच्यातील भागीदारी सातत्याने वाढ- परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर
परराष्ट्र व्यवहार मंत्री, डॉ. एस जयशंकर यांनी काल कुवेतचे युवराज शेख सबाह अल-खालेद अल-सबाह अल-हमद अल-मुबारक अल-सबाह यांची काल भेट घेतली. भारत आणि कुवेत यांच्यात सद्भावना आणि मैत्रीचे अनेक शतकांपासूनचे संबंध असून दोन्ही देशांमधील भागीदारीत सातत्याने वाढ होत आहे, असं डॉक्टर जयशंकर यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. उभय देशांदरम्यानचे हे संबंध आणखी वरच्या पातळीवर नेण्यासाठी युवराजांनी मार्गदर्शन करून सल्ला दिल्याबद्दल जयशंकर यांनी आपल्या संदेशात त्यांचे आभारही मानले आहेत. जयशंकर यांनी कुवेत...