July 19, 2024 8:07 PM

कोकणात गणपतीक जाऊचा? रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

गणेशोत्सवाच्या काळात होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनानं १ ते १८ सप्टेंबर या काळात गणपती विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, मुंबई सीएसएमटी स्थानक ते सावंतवाडी आणि रत्नागिरी, लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी आणि कुडाळ, तसंच दिवा जंक्शन ते चिपळूण दरम्यान दोन्ही बाजूंनी या विशेष गाड्यांच्या फेऱ्या होतील, असं रेल्वेनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.           

July 10, 2024 1:37 PM

अतिवृष्टीमुळे बोगद्यात पाणी शिरल्यानं कोकण रेल्वे विस्कळीत, अनेक गाड्या रद्द

गोव्यातल्या पेडणे इथं अतिवृष्टीमुळे बोगद्यात पाणी शिरल्यानं कोकण रेल्वे मार्गावरच्या अनेक गाड्या आज रद्द करण्यात आल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून मडगावला जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस, जनशताब्दी एक्सप्रेस, मांडवी एक्सप्रेस तसंच, मंगळुरू एक्सप्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मडगावहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मांडवी एक्सप्रेस, तेजस एक्सप्रेस, जनशताब्दी एक्सप्रेस आणि सावंतवाडी-दिवा एक्सप्रेस या गाड्याही आज रद्द झाल्या आहेत.    काल सुटलेली हजरत निजामुद्दीन-एर्नाकुलम मंगला एक...

June 20, 2024 7:30 PM

कोकण रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव

कोकण रेल्वे मार्गाच्या टप्प्याटप्प्यानं दुहेरीकरणासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवल्याची माहिती कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी आज वार्ताहरांना सांगितलं. गेल्या ३ वर्षात ५० किलोमीटरचे दुहेरीकरण पूर्ण झाले आहे. मडगांव ते ठोकर आणि कणकवली ते सावंतवाडी या दरम्यान दुहेरीकणासाठी प्रस्ताव आहे. तसंच पेरनेम आणि गोवा या दोन बोगद्यांचे नूतनीकरण करण्याची कोकण रेल्वेची इच्छा असल्याचे झा यांनी सांगितलं.