September 13, 2024 3:17 PM

गणेशोत्सवासाठी कोकणात गेलेले मुंबईकर परतीच्या वाटेला

गणेशोत्सवासाठी कोकणात गेलेले मुंबईकर आता परतीच्या वाटेला लागले आहेत. त्यामुळे माणगाव, इंदापूरसह मुंबई-गोवा महामार्गावरच्या अनेक शहरांमध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे,असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. पाच दिवसांच्या गौरी-गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर चाकरमानी कामावर रुजू होण्यासाठी मुंबईला परतत आहेत. त्यामुळे अनेक शहरात पुन्हा एकदा मोठी वाहतूक कोंडी पहायला मिळत आहे.

August 25, 2024 6:22 PM

पुण्यातून कोकणात जाण्यासाठी विमानसेवा सुरू

पुण्यातून कोकणात जाण्यासाठी ३१ ऑगस्ट पासून विमानसेवा सुरू होत आहे. पुणे ते गोवा आणि पुणे ते सिंधुदुर्ग या दोन्ही मार्गांवर थेट विमानसेवा सुरू होत आहे. एका खासगी विमान कंपनीकडून शनिवार आणि रविवारी ही विमानसेवा सुरू असेल. 

July 31, 2024 7:08 PM

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी !

गणपती उत्सवासाठी मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांकरता एसटी महामंडळानं यंदा २ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर दरम्यान ४ हजार ३०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, या विभागांमधल्या प्रमुख बसस्थानकांमधून या जादा गाड्या सोडल्या जाणार आहेत. या गाड्या आरक्षणासाठी npublic.msrtcors.com या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून, त्यांचं आरक्षण बसस्थानकावर, किंवा महामंडळाच्या MSRTC Bus Reservation ॲपद्वारे उपलब्ध होणार आहे.   गणेशोत्सवादरम्यान एसटीची वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी बसस्थान...

July 20, 2024 11:24 AM

गुजरात, कोकण, गोवा आणि कर्नाटक किनारपट्टीवर अतीवृष्टीचा हवामान विभागाचा इशारा

भारतीय हवामान खात्याने आज गुजरात, कोकण, गोवा, कर्नाटक किनारपट्टी आणि कर्नाटकच्या दक्षिणेकडील अंतर्गत भागात अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. केरळ, तेलंगणा, किनारी आंध्र प्रदेश, ओडिशा, विदर्भ, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश मध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.     तसंच मध्य महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या दक्षिणेकडील अंतर्गत भागात आगामी 4 दिवसांत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज आहे. दरम्यान, आज झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये गंगेच्या प्रदेशात आणि हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, ...

July 17, 2024 3:45 PM

मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यात पुढल्या ३ दिवसात अति मुसळधार पावसाचा अंदाज

मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यात पुढल्या तीन दिवसात अति मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर गुजरात, कर्नाटक, छत्तीसगड, केरळ, ओदिशा, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये पुढचे चार दिवस अति जोरदार पाऊस होईल.   हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पूर्व राजस्थान, पश्चिम राजस्थान, जम्मू काश्मीर, लडाख, पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि उत्तरप्रदेशात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार असल्याचं हवामान विभागाने कळवलं आहे.  

July 8, 2024 1:36 PM

मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाची हजेरी

मुंबईसह पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.   मुसळधार पावसामुळे कसाऱ्यापासून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाल्याने नाशिकहून मुंबईला जाणाऱ्या पंचवटी एक्सप्रेससह अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. नवी मुंबई परिसरात काल सकाळी जोरदार पाऊस झाल्याचं वृत्त असून, रेल्वे मार्गावरील साचलेल्या पाण्यामुळे कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांना अडथळा निर्माण होत आहे. पालघर जिल्ह्यातल्या उसगाव इथं पाण्यात अडकलेल्या १६ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात र...