August 20, 2024 7:30 PM

देशात खरीप पिकांच्या पेरणीत यंदा लक्षणीय प्रगती

देशात खरीप पिकांच्या पेरणीत यंदा लक्षणीय प्रगती दिसून येत आहे. आतापर्यंत १० कोटी ३१ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्यापैकी ३ कोटी ६९ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर भात, तर १ कोटी ८१ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर तृणधान्यांची पेरणी झाली आहे. १ कोटी १३ लाख ७० हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर कडधान्य, तर १ कोटी ८६ लाख ८० हजार हेक्टर क्षेत्रावर गळीत पिकांची पेरणी झाली असल्याचं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण विभागानं आज प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटलं आहे.

July 17, 2024 7:07 PM

खरीप हंगाम २०२३च्या पीक स्पर्धेचे राज्यस्तरीय निकाल जाहीर

राज्यात खरीप हंगामातल्या पिकांसाठी २०२३ मध्ये घेतलेल्या खरीप हंगाम स्पर्धेचे राज्यस्तरीय निकाल जाहीर झाले आहेत. यात भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग आणि सूर्यफूल अशा ११ पिकांचा समावेश आहे.    या स्पर्धेच्या, भात सर्वसाधारण गटात, चंद्रकात म्हातले यांना प्रथम क्रमांक मिळाला, तर आदिवासी गटात शेवंताबाई कडाळी यांनी प्रथम क्रमांक मिळवला. बाजरीसाठीच्या सर्वसाधारण गटात पुण्याच्या ताराबाई बांदल यांनी तर सोयाबीनच्या सर्वसाधारण गटामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातल्या बाळासाहेब ...

July 12, 2024 12:48 PM

या वर्षीच्या खरीप हंगामात कडधान्य लागवडीच्या क्षेत्रात वाढ

या वर्षीच्या खरीप हंगामात कडधान्य लागवडीच्या क्षेत्रात वाढ झाल्याबद्दल केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आनंद व्यक्त केला आहे. नवी दिल्ली इथं खरीप पिकांच्या प्रगतीचा आढावा घेताना ते बोलत होते. तुरीसारख्या कडधान्याच्या लागवडीच्या क्षेत्रात पन्नास टक्क्यांनी वाढ झाली आहे. कडधान्य उत्पादनात देशाला स्वयंपूर्ण करण्याला प्राधान्य असेल, असं ते म्हणाले. उडीद, तूर आणि मसूर या सर्व कडधान्यांच्या १०० टक्के खरेदीसाठी केंद्र सरकार वचनबद्ध असेल असंही ते यावेळी म्हणाले.