September 15, 2024 7:57 PM

केरळमधील मलप्पुरममध्ये तरुणाचा निपाह विषाणूने मृत्यू झाल्याचं स्पष्ट

केरळमधे मलप्पुरम जिल्ह्यात पेरिंतलमन्ना इथल्या खासगी रुग्णालयात मृत्यू झालेला तरुण निपाह विषाणूबाधित असल्याचं स्पष्ट झालं आहे. पुण्याच्या राष्ट्रीय विषाणूशास्त्र संस्थेनं त्याच्या शरीरातले नमूने तपासल्यानंतर, त्याचा मृत्यू निपाह विषाणूमुळे झाल्याचं स्पष्ट केलं आहे. या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी पावलं उचलली असून, १६ विविध समित्या स्थापन केल्या असल्याचं केरळच्या आरोग्यमंत्री विणा जॉर्ज यांनी सांगितलं.

September 12, 2024 1:15 PM

केरळ तिरुअनंतपुरम इथं पाच राज्यांच्या अर्थमंत्र्यांची आज बैठक

केरळ राज्यसरकारने पाच राज्यांच्या अर्थमंत्र्यांची बैठक आज राजधानी तिरुवअनंतपुरम इथं आयोजित केली आहे. केरळ खेरीज तमिळनाडू, कर्नाटक, तेलंगण आणि पंजाब या राज्यांचे अर्थमंत्री त्यात सहभागी होणार आहेत. केंद्र – राज्य संबंधांचा आर्थिक पैलू आणि १६ व्या वित्त आयोगात राज्यांना न्याय्य वाटा मिळवण्याच्या दृष्टीनं मोर्चेबंधणी हे या बैठकीचं उद्दिष्ट आहे. माजी केंद्रीय आर्थिक सल्लागार डॉ अरविंद सुब्रमणियन बैठकीत मार्गदर्शन करणार आहेत. 

August 7, 2024 11:31 AM

केरळ आणि आसाम या राज्यांना महाराष्ट्र शासनाकडून प्रत्येकी 10 कोटी रुपयांची मदत जाहीर

केरळ आणि आसाम या पूरस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या राज्यांना महाराष्ट्र शासनानं प्रत्येकी 10 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. राज्य शासनानं काल यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला. केरळ आणि आसाम या राज्यांच्या मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये ही रक्कम जमा केली जाईल.

August 6, 2024 7:33 PM

केरळ आणि आसामला महाराष्ट्र शासनाकडून प्रत्येकी १० कोटींची मदत

केरळच्या वायनाड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळं दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत जीवित आणि वित्तहानी झाली. या परिस्थितीवर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासनानं केरळला १० कोटी रुपयांची मदत दिली आहे. तसंच जुलै महिन्यात आसाम राज्यात पूरस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात हानी झाली. त्यातून सावरण्यासाठी आसामलाही महाराष्ट्र शासनाकडून १० कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे.

August 4, 2024 7:51 PM

झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ३०८ वर

वायनाड इथं दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ३०८ इतकी झाली आहे. अनेक जण अद्यापही बेपत्ता आहेत. सैन्य दल, भारतीय तटरक्षक दल, वायू सेना यांच्या मदतीने अद्यापही बचावकार्य सुरू असून पाच जणांना वाचवण्यात यश आलं आहे. मातीच्या ढिगाऱ्यात अद्यापही काही मृतदेह असण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून त्यांच्या शोधासाठी श्वानपथकाला पाचारण करण्यात आलं आहे. शोधात सापडणारे मृतदेह प्रशासनाच्या ताब्यात देण्यात येत आहेत.  

July 31, 2024 8:00 PM

केरळमधे वायनाड इथं झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या दोनशेच्या वर

केरळमधे वायनाड जिल्ह्यात काल दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या दोनशेच्या वर गेली आहे, तर १९१ लोक बेपत्ता आहेत. बचावकार्य आजही सुरू आहे. मुंडक्काई परिसरात मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली असून अनेक मृतदेह मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. काही मृतदेह चलियार नदीतून वाहत येत असून ते बाहेर काढण्यात येत आहेत. जखमी झालेल्या १८६ जणांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.    चुरालमाला इथं तात्पुरता पूल उभारण्याचे लष्कराचे प्रयत्न,  सातत्यानं पडत असलेला जोरदार पाऊस आणि नदीच्या जोरदा...

July 30, 2024 8:39 PM

केरळमध्ये वायनाड जिल्ह्यात दरड कोसळून ९३ जणांचा मृत्यू, १२८ जण जखमी

केरळच्या वायनाड जिल्ह्यातल्या मुंडक्काई, अट्टामाला आणि चूरमाला या भागात मुसळधार पावसामुळे आज भूस्खलन झाल्यानं ९३ जणांचा मृत्यू झाला तर १२८ हून अधिक जण जखमी झाले. जखमींवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भूस्खलन झालेल्या भागात एनडीआरएफचं पथक, लष्कर तसंच नौदलाचे जवान बचावकार्य करत आहेत. मुंडक्काईच्या डोंगराळ भागातून १५० नागरिकांना वाचवण्यात आलं आहे.   चूरमाला इथं नदीवरचा पूल वाहून गेल्यानं दोरीच्या साहाय्यानं अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यात आली. मेप्पडी इथं मदत केंद्र उभारण्यात आलं आहे. द...

July 26, 2024 11:24 AM

केरळमध्ये निपाह विषाणूचा फैलाव

केरळमध्ये निपाह विषाणूचा फैलाव झाला असून, काल मांजेरी आणि कोझिकोड इथल्या वैद्यकीय महाविद्यालयात दोन रुग्णांना दाखल करण्यात आलं आहे. त्यामुळे या दोन्ही रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या रुग्णांची एकंदर संख्या आठ झाली आहे.   गेल्या रविवारी निपाह विषाणूमुळे बळी गेलेल्या 14 वर्षांच्या मुलाच्या संपर्कात आलेल्या आठ जणांना बाधा झाली नसल्याचं आढळून आलं आहे, असं केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितलं. पंडिक्कड आणि अनक्क्यम पंचायतींमध्ये आरोग्य अधिकाऱ्यांनी केलेल्या सर्वेक्षणात आतापर्यंत 27 हजा...

July 17, 2024 11:56 AM

केरळला मुसळधार पावसानं झोडपल्यानं मोठं नुकसान

केरळला मुसळधार पावसानं झोडपल्यानं संपूर्ण राज्यात विशेषतः उत्तर आणि मध्य भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. राज्याच्या डोंगराळ भागात तसंच नदीकाठच्या भागांना देण्यात आलेला अतिदक्षतेचा इशारा अद्यापही कायम आहे. पावसाचा फटका जिल्ह्यांमध्ये मदत शिबिरं सुरू करण्यात आली आहेत. तसंच कन्नूर, कोळीकोड, वायनाड, पलक्कड, त्रिशूर, इडुक्की, अलापुझा आणि कोट्टायम या आठ जिल्ह्यांमध्ये संततधार पाऊस सुरू असल्यानं तिथल्या सर्व शैक्षणिक संस्थांना प्रशासनानं सुट्टी जाहीर केली आहे.   तथापि परीक्षांच्या पूर्वनियो...

July 5, 2024 8:22 PM

उपराष्ट्रपती जगदीप धनखड दोन दिवसांच्या केरळ दौऱ्यावर

उपराष्ट्रपती जगदीप धनखड उद्या दोन दिवसांच्या केरळच्या दौऱ्यावर जाणार आहेत. उद्या सकाळी तिरुअनंतपुरम इथल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या १२ व्या पदवीदान समारंभाला ते उपस्थित राहणार आहेत. सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना ते सुवर्णपदकं प्रदान करणार आहेत. या पदवीदान समारंभानंतर उपराष्ट्रपती कोल्लमला रवाना होणार आहेत.