August 21, 2024 12:48 PM

काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी निमलष्करी दलाच्या तुकड्या तैनात

काश्मीरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका सुरळीत पार पडाव्यात यासाठी केंद्र सरकारने निमलष्करी दलाच्या जवळपास तीनशे तुकड्या तैनात केल्या आहेत.  यात सीआरपीएफ, बीएसएफ, एसएसबी आणि आयटीबीपी या निमलष्करी दलांचा समावेश आहे. श्रीनगर, हुंदवडा, गंदेरबाल, बडगाम, कुपवाडा, बारामुल्ला, बांदीपोरा, अनंतनाग, शोपियां, पुलवामा, अवंतीपोरा, आणि कुलगाम जिल्ह्यात निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत.    तीन टप्प्यात होणाऱ्या या निवडणुकीची पहिली अधिसूचना काल जाहीर करण्यात आली होती. पहिल्या टप्प्यातलं मतदान १८...

June 29, 2024 8:13 PM

अमरनाथ यात्रेला आजपासून सुरुवात

अमरनाथ यात्रेला आज सुरुवात झाली. अमरनाथ यात्रेसाठी जम्मूतल्या भगवती नगर बेस कॅम्प इथून आज पहाटे चार हजार २९ यात्रेकरूंची दुसरी तुकडी रवाना झाली. कडेकोट सुरक्षेसह यात्रेकरूंच्या २०० वाहनांचा ताफा काश्मीर खोऱ्याकडे रवाना झाला. तत्पूर्वी बेस कॅम्पचा परिसर बम बम भोले, हर हर महादेवच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. जम्मू बेस कॅम्प इथून आतापर्यंत आठ हजार ६३२ यात्रेकरू अमरनाथ यात्रेसाठी रवाना झाले आहेत. हेलिकॉप्टर सेवेद्वारे पोहोचलेल्या तीन हजारहून अधिक यात्रेकरूंनी आज  पवित्र गुफेत शिवलिंगाचे दर्शन घेत...

June 16, 2024 2:41 PM

जम्मू – काश्मीरमधल्या सुरक्षा स्थितीचा आढावा घेण्यासाठी अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक

जम्मू आणि काश्मीरमधल्या सुरक्षा स्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक सुरू आहे. जम्मू -काश्मीरमध्ये अलिकडे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर तिथल्या सुरक्षा स्थितीचा आढावा या बैठकीत घेण्यात येत आहे.   राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला या बैठकीला उपस्थित आहेत. गुप्तचर विभागाचे संचालक, लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे, नवनियुक्त लष्करप्रमुख उपें...