July 26, 2024 8:38 PM

कारगिल युद्धातला विजय सत्य, संयम आणि सामर्थ्याचं अतुलनीय उदाहरण – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

कारगिलमध्ये आपण केवळ युद्ध जिंकलं नाही, तर सत्य, संयम आणि सामर्थ्याचं अतुलनीय उदाहरण जगापुढे ठेवलं असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.   २५ व्या कारगिल विजय दिना निमित्त, प्रधानमंत्री मोदी यांनी आज लडाख मधल्या कारगिल युद्ध स्मारकाला भेट दिली आणि कारगिल युद्धात कर्तव्य बजावताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या जवानांना त्यांनी आदरांजली वाहिली. त्यावेळी ते बोलत होते. आजचा दिवस प्रत्येक भारतीयासाठी महत्वाचा असून, देशाचं रक्षण करणाऱ्या सर्वांना आदरांजली वाहण्याचा हा दिवस असल्याचं त्यांनी सम...