July 19, 2024 7:20 PM
मविआ विधानसभा निवडणुकीला एकत्र सामोरी जाणार – काँग्रेस सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल
महाविकास आघाडी आगामी विधानसभा निवडणुकीला एकत्र सामोरी जाणार असून तिन्ही घटकपक्ष एकत्र बसून जागावाटपावर चर्चा करतील, अशी माहिती अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी दिली आहे. काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांची आज मुंबईत बैठक झाल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. या बैठकीत काँग्रेसचं संघटन मजबूत करण्यावर चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. लोकसभा आणि त्यानंतर देशभरात झालेल्या पोटनिवडणुकीतही भाजपाचा पराभव झाला आहे. महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकीतही राज्यातल्या महाभ्र...