September 25, 2024 2:26 PM

झारखंड विधानसभेच्या निवडणुकीत भाजपा, संयुक्त जनता दल आणि अखिल झारखंड विद्यार्थी संघटनेसोबत युती करणार

झारखंड विधानसभेच्या निवडणुकीत भाजपा, संयुक्त जनता दल आणि अखिल झारखंड विद्यार्थी संघटनेसोबत युती करणार आहे. तिन्ही पक्षांमध्ये जागावाटपाची चर्चा शेवटच्या टप्प्यात आहे. पुढच्या आठवड्यात जागा वाटप जाहीर केलं जाईल, असं भाजपाचे राज्य सहप्रभारी हिमंता बिस्व शर्मा यांनी सांगितलं.

July 25, 2024 8:22 PM

झारखंड विधानसभेच्या दोन आमदारांचे सदस्यत्व रद्द

झारखंड विधानसभा अध्यक्ष रवींद्रनाथ महतो यांनी आज दोन आमदारांचे सदस्यत्व रद्द केले. झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाचे आमदार लोबिन हेम्ब्रोम आणि भाजप आमदार जे पी पटेल पक्षांतरासाठी दोषी आढळले होते. झारखंड मुक्ती मोर्चा चे आमदार लोबिन हेम्ब्रोम यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राजमहल मतदारसंघात त्यांच्याच पक्षाच्या उमेदवाराविरुद्ध अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूकीला उभे राहिले होते. तर भाजपचे आमदार जे.पी पटेल यांनी हजारीबाग मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढवली होती.