August 29, 2024 3:28 PM

राज्यात कणा नसलेले सरकार असल्याची जयंत पाटील यांची टीका

हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातल्या तलाठ्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून हत्या केल्याच्या घटनेवरून राज्यात कणा नसलेले सरकार असल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. ते मुंबईत बोलत होते. राज्यातल्या महिला, मुली, सामान्य नागरिक सुरक्षित नव्हतेच पण आता राज्यातले शासनाचे अधिकारी सुरक्षित नसल्याचं त्यांनी समाजमाध्यमांवरील पोस्ट मध्ये म्हटलं आहे.

August 28, 2024 4:50 PM

महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून राजकोट किल्ल्यावरील पुतळ्याची पाहणी

राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवरायांचा केवळ पुतळा पडला नसून महाराष्ट्राचा स्वाभिमान पडला आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरच्चंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. जयंत पाटील यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबत राजकोट किल्ल्याला भेट दिली. त्यापूर्वी वार्ताहरांशी संवाद साधताना पाटील बोलत होते.  पुतळा बनवण्याचं काम अपरिपक्व माणसाला दिलं होतं, याची जबाबदारी सरकारला झटकता येणार नाही, असं पाटील म्हणाले. या प्रकरणाची चौकश...

July 15, 2024 7:07 PM

महाराष्ट्र जनसुरक्षा कायद्याच्या आधारे शहरी नक्षलवादाच्या नावाखाली पुरोगामी चळवळींना लक्ष्य करण्याचा सरकारचा उद्देश – जयंत पाटील

प्रस्तावित महाराष्ट्र जनसुरक्षा कायद्याच्या आधारे शहरी नक्षलवादाच्या नावाखाली पुरोगामी चळवळींना लक्ष्य करण्याचा सरकारचा उद्देश आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. ब्रिटिश सरकारनं स्वातंत्र्यपूर्व काळात आणलेल्या रैालेट ॲक्टच्या धर्तीवर आधारलेला हा कायदा सरकार अध्यादेशाद्वारे आणत असल्याचं पाटील यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे. या कायद्याद्वारे पोलिसांना अमर्याद अधिकार दिले जाणार असून कोणतंही कारण न दाखवता ते एखाद्या संघटनेला ‘बेकायदेशीर’...

June 23, 2024 3:39 PM

विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशपरीक्षा राज्यपातळीवर घेण्याची जयंत पाटील यांची मागणी

विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशपरीक्षा राज्यपातळीवर घेण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश परीक्षा म्हणजेच नीट-पीजी पुढे ढकलल्याबद्दल त्यांनी  केंद्र सरकारवर टीका केली आहे.   विविध प्रवेशपरीक्षांवरच्या आक्षेपांच्या पार्श्वभूमीवर आजची नीट-पीजी  रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.  विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे आणि परीक्षेचं सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर ...