July 9, 2024 2:10 PM
जम्मू काश्मीरमधे दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संरक्षण दलांची शोधमोहीम सुरू
जम्मू काश्मीरमधल्या कठुआ जिल्ह्यात काल झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कठुआ जिल्ह्यातल्या माचेडी भागात संरक्षण दलांनी शोधमोहीम सुरू केली आहे. हेलिकॉप्टर, बॉम्बशोधक श्वान आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं ही मोहीम राबवली जात आहे. परकीय देशातून आलेल्या तीन ते चार दहशतवाद्यांनी हा हल्ला केल्याचा अंदाज आहे. २८ एप्रिल रोजी बसंतगढ इथं ग्राम रक्षकाची हत्या करणाऱ्या गटाचाच ते भाग असल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. लष्कराच्या पाच जवानांना वीरमरण आल्याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दुः...