August 11, 2024 1:15 PM

‘कशूर रिवाज’ सांस्कृतिक महोत्सवात तरुणींच्या सर्वात मोठ्या काश्मिरी लोकनृत्याचा जागतिक विक्रम

जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात आयोजित कशूर रिवाज या सांस्कृतिक महोत्सवात आतापर्यंत दहा हजार मुलींनी सर्वाधिक संख्येनं काश्मिरी लोकनृत्य सादर करून विश्वविक्रम केला आहे. ‘यूआरएफ’ अर्थात, युनिव्हर्सल रेकॉर्ड फोरममध्ये त्यांच्या नावाची नोंद झाली आहे. ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त हे लोकनृत्य सादर केलं गेलं. बारामुल्ला जिल्हा प्रशासन आणि इंद्राणी बालन फाउंडेशन यांनी संयुक्तपणे या कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं. प्रोफेसर शौकत अली इनडोअर स्टेडियममध्ये या महोत्सवाचं आयोजन करण्यात आले होते.

August 8, 2024 2:29 PM

जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि राजस्थान मध्ये मुसळधार पावसाची शक्यता

  भारतीय हवामान विभागानं देशाच्या पूर्व, पश्चिम, मध्य, वायव्य आणि ईशान्य भागात विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पुढल्या ५ दिवसांत देशाच्या दक्षिण भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल तर कर्नाटकच्या किनारपट्टीवर आज मुसळधार पावसाची शक्यता आहे.   हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि जम्मू-काश्मीरमध्ये शनिवारपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. झारखंड, उत्तर ओदिशा, छत्तीसगडमध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता असल्...

August 5, 2024 1:08 PM

जम्मू आणि काश्मीर मधून कलम 370 रद्द करण्यात आलं त्याला 5 वर्षे पूर्ण

जम्मू आणि काश्मीर मधून कलम 370 रद्द करण्यात आलं त्याला आज 5 वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर जम्मू जिल्ह्यातील अखनूर भागात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वतोपरी सुरक्षाउपाय करण्यात येत असून सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले असल्याचं जम्मू चे पोलिस अधीक्षक अजय शर्मा यांनी सांगितलं आहे.

July 30, 2024 10:08 AM

अमरनाथ यात्रेसाठी आणखी एक तुकडी जम्मू-काश्मीरमधल्या भगवतीनगर यात्री निवासातून रवाना

अमरनाथ यात्रेसाठी 1477 यात्रेकरूंची आणखी एक तुकडी आज पहाटे जम्मू-काश्मीरमधल्या भगवतीनगर यात्री निवासातून रवाना झाली. आज पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास 52 वाहनांमधून रवाना झालेल्या तुकडीत 1142 पुरुष, 254 महिला, तीन मुलं, 66 साधू आणि 12 साध्वींचा समावेश आहे.

July 27, 2024 3:02 PM

जम्मू-काश्मीरमधल्या बेसकॅम्पमधून आज १ हजार ७७१ यात्रेकरू अमरनाथ गुहेकडे रवाना

जम्मू-काश्मीरमधल्या भगवती नगर यात्री निवास इथल्या बेसकॅम्पमधून आज एक हजार ७७१ यात्रेकरू अमरनाथ गुहेकडे रवाना झाले. यात्रेकरूंना घेऊन जाणारी ६३ वाहने पहाटे पवित्र गुफेच्या दिशेने रवाना झाली. यातले ७७२ यात्रेकरू बाल्ताल मार्गाने तर ९९९ यात्रेकरू पहलगाम मार्गाने पुढचा प्रवास करतील.

July 27, 2024 2:43 PM

जम्मू आणि काश्मीरमध्ये वर्ष २०२५ अखेरपर्यंत ४० हजार इमारतींवर सौर ऊर्जेचे प्रकल्प उभारण्याचं सरकारचं उद्दिष्ट

जम्मू आणि काश्मीरमध्ये वर्ष २०२५ अखेरपर्यंत शासकीय आणि निवासी अशा सुमारे ४० हजार इमारतींवर सौर ऊर्जेचे अनेक प्रकल्प उभारण्याचं उद्दिष्ट सरकारनं ठेवलं आहे. यामुळे डिसेंबर २०२५ पर्यंत जम्मू आणि काश्मीरमध्ये अतिरिक्त २७० मेगावॅट सौर ऊर्जेची निर्मिती होणार आहे.   या माध्यमातून २० हजार घरगुती आणि किमान २२ हजार ४९४ शासकीय इमारतींचा यात समावेश होणार आहे. जम्मू आणि काश्मीर ऊर्जा विकास संस्था प्राथमिक स्तरावर याची अंमलबजावणी करणार आहे. या धर्तीवर वर्ष २०३० अखेरपर्यंत ५०० मेगावॅट तर वर्ष २०४७ अखेरपर्...

July 26, 2024 6:52 PM

जम्मू आणि काश्मिरच्या सुधारित औद्योगिक जमीन वाटप धोरणाला मंजुरी

जम्मू आणि काश्मिरच्या सुधारित औद्योगिक जमीन वाटप धोरणाला आज मंजुरी मिळाली. नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्रशासकीय परिषदेच्या बैठकीत २०२१ ते ३० या कालावधीसाठीच्या धोरणाला मंजुरी मिळाली. यामुळं जमीन वाटपाची प्रक्रिया सोपी होणार आहे. किमान ४ हजार कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक करणाऱ्या मोठ्या प्रकल्पांना या धोरणामुळं सरकार प्राधान्यानं जमीन वाटप करू शकणार आहे.

July 18, 2024 2:35 PM

जम्मू-काश्मीरमधल्या डोडा येथे झालेल्या चकमकीत 2 जवान जखमी

जम्मू आणि काश्मीरमधल्या डोडा जिल्ह्यात आज पहाटे दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत दोन जवान जखमी झाले आहेत. जद्दन बटा गावात शोध मोहिमेसाठी उभारलेल्या लष्कराच्या छावणीवर दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर ही चकमक सुरू झाली. सुमारे एक तास झालेल्या या चकमकीत जवानांनी दहशतवाद्यांच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलं. दरम्यान, सोमवारी आणि मंगळवारी दहशतवादी हल्ल्यात चार लष्करी जवान शहीद झाल्यानंतर देस्सा आणि आजूबाजूच्या परिसरात व्यापक शोध मोहीम राबवण्यात येत आहे.

July 16, 2024 3:01 PM

जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात सुरक्षा दलाचे ५ जवान शहीद

जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात काल रात्री दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत गंभीर जखमी झालेल्या पाच सुरक्षादल जवानांचा आज मृत्यू झाला. यात लष्कराच्या एका अधिकाऱ्याचाही समावेश आहे. या भागात दहशतवाद्यांचा वावर असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या विशेष कार्य दलाच्या पथकांनी शोधमोहीम राबवली.   या दरम्यान दहशतवाद्यांशी चकमक होऊन पाच जवान जखमी झाले होते. त्या पाचही जणांना आज वीरमरण आलं. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी याबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. कर्त...

July 10, 2024 3:08 PM

जम्मू काश्मीरमध्ये चकमक झालेल्या ठिकाणी शोधमोहीम

जम्मू काश्मीरमधल्या दोडा जिल्ह्यात संरक्षण दल आणि दहशतवाद्यांमध्ये काल चकमक झालेल्या ठिकाणी शोधमोहीम राबवली जात आहे. संरक्षण दलाने काल शोधमोहीम सुरू केली होती. पण, अंधार आणि पावसामुळे मोहीम थांबवण्यात आली होती. आज दिवस सुरू होताच संरक्षण दलांच्या जवानांनी पुन्हा जंगलात लपलेल्या दहशतवाद्यांचा शोध सुरू केला.