September 14, 2024 2:01 PM

जम्मू काश्मिरमधल्या बारामुल्ला जिल्ह्यात झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी मारले गेले

जम्मू काश्मिरमधल्या बारामुल्ला जिल्ह्यात क्रीरी इथं सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी मारले गेले. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार क्रीरी परिसरातल्या एका गावात लपलेले दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये जोरदार चकमक झाली. त्यात दहशतवादी मारले गेले. लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानंही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

September 14, 2024 2:07 PM

जम्मू-काश्मीर मधल्या किश्तवाड़ जिल्ह्यात दोन जवान शहीद

जम्मू-काश्मीर मधल्या किश्तवाड़ जिल्ह्यात काल दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन  भारतीय जवान शहीद झाले. तर दोन जवान जखमी झाले.  किश्तवाड जिल्ह्यात छत्रू बेल्ट इथल्या नैडगाम परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाल्यानंतर तिथं शोध मोहिम सुरू करण्यात आली.   या मोहिमे दरम्यान, नैडगाम गावाजवळच्या जंगलात लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर बेछूट गोळीबार केला. त्यात चार जवान गोळी लागून जखमी झाले. त्यांना तातडीनं जवळच्या रुग्णालयात नेलं. दरम्यान, या परिसरात अजूनही जैश-ए-मोहम...

September 14, 2024 2:02 PM

जम्मू-काश्मीर मध्ये युवा वर्गाच्या राजकारणातल्या सहभागामुळे विकासाचं नवं युगं अवतरल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

गेल्या काही वर्षांत जम्मू- काश्मीर मध्ये युवकांच्या राजकारणातल्या सहभागामुळे विकासाचं नवं युगं अवतरल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज जम्मू- काश्मीरमध्ये डोडा इथं प्रचारसभेला संबोधित केलं.  स्वातंत्र्यानंतर जम्मू- काश्मीर हा प्रदेशावर जगाचं लक्ष असल्याचं ते म्हणाले. यापूर्वी ज्या पक्षांवर जम्मू- काश्मीरच्या नागरिकांनी विश्वास ठेवला, त्या पक्षांनी फक्त परिवारवादाला महत्व दिल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे जम्मू- काश्मीरमधला युवा वर्ग हा आतंकवादामुळे पिचला असल्याचं त्य...

September 12, 2024 1:48 PM

जम्मू – काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात दारूगोळा आणि स्फोटकांचा मोठा साठा जप्त

जम्मू - काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात सुरक्षा दलांनी दारूगोळा आणि स्फोटकांचा मोठा साठा जप्त केला आहे. यासंदर्भात मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे लष्कर आणि जम्मू काश्मीर पोलीस यांनी केरन विभागात संयुक्तपणे ही कारवाई केली. त्यात  ए के-47 आणि  आर.पी.जी च्या फैरी तसंच  ई ए डी आणि हातबॉम्ब यांचा मोठा साथ हाती लागला. विशेष निवडणूक निरीक्षकांकडून ह्या संदर्भातली खबर कळल्याचं श्रीनगर इथल्या संरक्षण दलाच्या प्रवक्त्यानं सांगितलं. यामुळे मोठा धोका टळला असून यामुळे इथली परिस्थिती स्थिर आणि शांत राहू शकेल...

September 11, 2024 1:42 PM

पाकिस्तानी सैन्याकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करुन केलेल्या गोळीबारात BSF चा एक जवान जखमी

पाकिस्तानी सैन्यानं शस्त्रसंधी कराराचं उल्लंघन करत जम्मू - काश्मिरमध्ये अखनूर इथल्या नियंत्रण रेषेजवळील भारतीय चौक्यांवर विनाकारण गोळीबार केला. या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा एक जवान जखमी झाला. पाकिस्ताननं केलेल्या गोळीबाराला बीएसएफच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं.   मध्यरात्री अडीचच्या सुमारास नियंत्रण रेषेजवळ असलेल्या भारतीय चौक्यांवर गोळीबार केल्याची माहिती बीएसएफच्या प्रवक्त्यानं दिली. या घटनेनंतर जवानांना अधिक सतर्क राहण्याच्या तसंच सीमाभागातील गस्त वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

September 8, 2024 2:19 PM

जम्मू काश्मीरमधे विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या प्रचाराला वेग

जम्मू काश्मीरमधे विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात उमेदवारी मागं घेण्याची मुदत संपली असून आता प्रचाराला वेग येत आहे. भारतीय जनता पार्टीनं प्रचाराला जोमदार सुरुवात केली आहे. पक्षाचे स्टार प्रचारक संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आज रामबन आणि बनिहालमधे प्रचारसभा घेत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल जम्मूच्या पालोरा भागात सभा घेतली. काँग्रेस नेता राहुल गांधी यांनीही जम्मू काश्मीरला भेट दिली. या आठवड्यात प्रधआनमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान, नितीन गडकरी, पक्षाध्यक्ष...

August 27, 2024 9:54 AM

जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची नऊ उमेदवारांची यादी जाहीर

आगामी जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं नऊ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पक्षानं आपले नेते गुलाम मोहम्मद मीर यांना डोरू विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे, तर शेख रियाझ दोडा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. दोडा पश्चिम विधानसभा मतदारसंघातून प्रदीपकुमार भगत हे काँग्रेसचे उमेदवार असतील.

August 19, 2024 1:27 PM

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा वाढवली

जम्मू काश्मीर मध्ये गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे.खोऱ्यातल्या बाटोटे - डोडा - किश्तवाड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २४४ आणि जम्मू ते श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर त्याचप्रमाणे डोडा, रामबान आणि उधमपूर जिल्ह्यात विविध सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आल्या आहेत. यामध्ये कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारीत चेहऱ्याने ओळख पटवणारी प्रणाली, ड्रोन द्वारे गस्त त्याचप्रमाणे सीसीटीव्ही च्या माध्यमातून देशविघातक कारवायांवर लक्ष ठेवले जा...

August 16, 2024 7:29 PM

जम्मू-काश्मीरमध्ये तीन टप्प्यात आणि हरयाणामध्ये एका टप्प्यात विधानसभा निवडणूक

केंद्रीय निवडणूक आयोगानं जम्मू काश्मीर आणि हरयाणा या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम आज जाहीर केला. जम्मू काश्मीरमध्ये १८ सप्टेंबर,  २५ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर २०२४ अशा तीन टप्प्यात मतदान होईल. जम्मूमध्ये ४३ आणि काश्मीरमध्ये ४७ असे एकूण ९० मतदारसंघ आहेत. काश्मिरी पंडित आणि पीओके मधील विस्थापितांसाठी  नायब राज्यपालांकडून एकूण तीन जागांवर उमेदवार दिले जातील. त्यामुळे या राज्यात एकूण ९३ जागांसाठी मतदान होणार आहे.       हरयाणा विधानसभेच्या ९० जागांसाठी १ ऑक्टोबर रोजी मतदान हो...

August 11, 2024 1:52 PM

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत २ जवान शहीद

जम्मू काश्मीरमधील आनंतनाग जिल्ह्यातील कोकरनाग भागात दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद झाले. चकमकी दरम्यान,  गंभीर जखमी जवानांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्‍यांचा मृत्यू झाला. संरक्षण विभागाच्या प्रवक्त्यांनी ही माहिती दिली. या चकमकीत दोन नागरिकही जखमी झाले. कालपासून सुरू झालेली ही दहशतवाद्यांसोबतची चकमक आजही सुरूच असल्याचं वृत्त आहे.