August 25, 2024 3:24 PM

देशाला जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था करण्याच्या वाटचालीत महिलांचा मोठा वाटा – प्रधानमंत्री

देशाला जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था करण्याच्या वाटचालीत महिलांचा मोठा वाटा असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. जळगाव मध्ये आज झालेल्या लखपती दिदी संमेलनात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज देशभरातल्या ११ लाख नव्या लखपती दीदींना, प्रतिकात्मक स्वरुपात प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव केला गेला, त्यावेळी ते बोलत होते. गेल्या दहा वर्षांत १ कोटी लखपती दीदी झाल्या आहेत, तर गेल्या दोन महिन्यात त्यात आणखी ११ लाख लखपती दीदींची भर पडल्याची माहिती प्रधानमंत्र्यांनी यावेळी दिल...

August 25, 2024 10:40 AM

नेपाळ बस दुर्घटनेतल्या २५ जणांचे मृतदेह जळगावात दाखल

नेपाळ इथल्या बस दुर्घटनेतल्या २५ जणांचे मृतदेह काल जळगावच्या विमानतळावर वायुदलाच्या विशेष विमानानं आणण्यात आले. त्यानंतर संपूर्ण शासकीय प्रक्रियेच्या पूर्ततेनंतर ते नातेवाईकांना सुपूर्द करण्यात आले. केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांसह अन्य लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते.

June 27, 2024 9:17 AM

जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा बसस्थानकाला सुंदर बसस्थानक अभियानाचा पुरस्कार जाहीर

राज्य परिवहन महामंडळाच्या हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानात अ वर्गामध्ये जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा बसस्थानकानं प्रथम क्रमांक मिळवला आहे.   चोपडा आगाराचे व्यवस्थापक महेंद्र पाटील याबाबत प्रतिक्रिया देताना म्हणाले, या अभियानाअंतर्गत 'ब' वर्गामध्ये भंडारा जिल्ह्यातल्या साकोली बसस्थानकाला तर 'क' वर्गामध्ये सातारा जिल्ह्यातल्या मेढा बसस्थानकाला प्रथम क्रमांक मिळाला आहे. लोकसहभागातून बसस्थानकाचा विकास या संकल्पनेवर राज्यात हे अभियान राबवण्यात आलं.