September 12, 2024 9:03 AM

जल जीवन मिशन तसंच स्वच्छ भारत अभियानाच्या अंमलबजावणीला गती द्यावी – मंत्री गुलाबराव पाटील

जल जीवन मिशन तसंच स्वच्छ भारत अभियानाच्या अंमलबजावणीला गती द्यावी, असे निर्देश पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत. काल मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. घनकचरा व्यवस्थापन, सार्वजनिक शौचालयांची उभारणी, वैयक्तिक घरकुलं तसंच शौचालयांची कामं जलद पूर्ण करावीत, १५ व्या वित्त आयोगातून मिळणाऱ्या निधीतून या घटकांवर खर्च करण्याच्या सूचना ग्रामपंचायतींना देण्यात याव्यात, असंही गुलाबराव पाटील यांनी सांगितलं.

August 8, 2024 8:08 PM

देशातील ७७ टक्क्यांहून अधिक ग्रामीण कुटुंबांना नळ जोडणी – मंत्री सी आर पाटील

सरकारनं जल जीवन मिशन अंतर्गत देशभरातील ७७ टक्क्यांहून अधिक ग्रामीण कुटुंबांना नळ जोडणी दिली आहे असं पूरक प्रश्नांना उत्तर देताना केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी सांगितलं. या योजने अतंर्गत आतापर्यंत १५ कोटी कुटुंबांना नळ जोडणी दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

July 23, 2024 8:48 PM

जल जीवन मोहिमेअंतर्गत १५ कोटी कुटुंबांना नळाद्वारे शुद्ध पाणी

जल जीवन मोहिमेनं देशभरातल्या ग्रामीण भागातल्या १५ कोटी कुटुंबांना नळाद्वारे पाण्याची जोडण्या देऊन ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. जल जीवन मोहिमेच्या माध्यमातून लोकांना शुद्ध पाणी मिळालं असून त्यांत जीवनमान सुधारलं असल्याचं जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी समाज माध्यमावर केलेल्या पोस्ट मध्ये म्हटलं आहे.२०२४ पर्यंत प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला नळाच्या पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करण्याच्या उद्देशानं २०१९ मध्ये जल जीवन मोहिमेची घोषणा करण्यात आली.