September 14, 2024 1:15 PM

उपराष्ट्रपती जगदीप धनखड आजपासून दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर

उपराष्ट्रपती जगदीप धनखड आजपासून दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यादरम्यान, ते, दूरस्थ मध्यमातून, मुंबईतील एल्फिन्स्टन टेक्निकल कॉलेजमध्ये, राज्यभरातल्या ४३४ आयटीआय संस्थांमधील संविधान मंदिरांचं उद्घाटन करतील. तसंच, नागपूर इथल्या रामदेवबाबा विद्यापीठातल्या डिजिटल टॉवरचं उद्घाटनही उपराष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे.  

September 4, 2024 1:17 PM

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पदकं जिंकल्याबद्दल राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांकडून खेळाडूंचं अभिनंदन

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पदकं जिंकल्याबद्दल शरद कुमार, मरियप्पन थंगावेलू, अजित सिंग आणि सुंदर सिंग या खेळाडूंचं,  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी  अभिनंदन केलं आहे.  या खेळाडूंची  कामगिरी ही शाश्वत उत्कृष्टतेची उदाहरणे असून त्यांचं यश उच्च आंतरराष्ट्रीय दर्जा गाठण्याची आकांक्षा असलेल्या खेळाडूंना प्रेरणा देईल, असं राष्ट्रपती मुर्मू यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. उपराष्ट्रपती धनखड यांनी या खेळाडूंचं अभिनंदन करताना भारताला य...

August 16, 2024 10:15 AM

उपराष्ट्रपती जगदीप धनखड आजपासून दोन दिवसांच्या तेलंगण आणि आंध्र प्रदेशच्या दौऱ्यावर

उपराष्ट्रपती जगदीप धनखड आजपासून तेलंगण आणि आंध्र प्रदेशच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. दौऱ्याच्या आजच्या पहिल्या दिवशी धनखड हैदराबाद, मधल्या कान्हा शांती वनमला भेट देतील.   उद्या ते अक्षरा विद्यालय परिसर आणि कौशल्य विकास केंद्र, स्वर्ण भारत ट्रस्ट आणि आंध्र प्रदेशातील नेल्लोर इथल्या मुप्पावरपू फाउंडेशनला भेट देतील. त्यानंतर, ते आंध्र प्रदेशातील वेंकटचलम, स्वर्ण भारत ट्रस्टच्या 23 व्या वर्धापन दिनाच्या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून अध्यक्षस्थानी असतील.