September 20, 2024 12:25 PM

इटलीमध्ये बोरिस वादळामुळे २४ जणांचा मृत्यू

बोरिस वादळामुळे मध्य युरोपात २४ जणांचा मृत्यू झाला आहे. नद्यांचे पाणी इटलीच्या एमिलिया रोमग्ना प्रांतातल्या अनेक शहरांमध्ये शिरल्याने हजारो नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आलं आहे. या भागातल्या शाळा, कार्यालय, रेल्वे सेवा सध्या बंद आहेत.

July 14, 2024 12:09 PM

उद्योग मंत्री पीयूष गोयल मंगळवारपासून इटलीच्या दोन दिवसीय दौऱ्यावर

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल मंगळवारपासून इटलीच्या दोन दिवसीय दौऱ्यावर जात आहेत. तिथे रेजिओ कॅलाब्रिया इथे होणाऱ्या जी7 व्यापार मंत्र्यांच्या बैठकीत ते सहभागी होतील. तसंच, सहभागी राष्ट्रांसोबतच्या द्विपक्षीय बैठकींमध्ये गोयल सहभागी होतील. ही भेट व्यापार आणि गुंतवणुकीच्या मोठ्या संधींचं प्रदर्शन करणार्‍या भारताच्या धोरणात्मक प्रयत्नांना अधोरेखित करत असल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने एका निवेदनात म्हटलं आहे.   इटलीला भेट देण्यापूर्वी गोयल आज आणि उद्या स्वित्झर्लंडमध्ये ...

June 14, 2024 7:45 PM

प्रधानमंत्र्यांची इटलीमधे विविध राष्ट्रांच्या प्रमुखांशी द्विपक्षीय चर्चा संपन्न

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इटलीमधे अपुलिया इथं आज विविध राष्ट्रांच्या प्रमुखांशी द्विपक्षीय चर्चा केली. जी सेव्हन देशांच्या शिखर परिषदेसाठी मोदी सध्या इटलीत आहेत. आज दुपारी त्यांनी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्राँ यांच्याशी चर्चा केली. संरक्षण, अंतराळ, शिक्षण, हवामान बदल, पायाभूत सुविधा, उर्जा, क्रीडा इत्यदी क्षेत्रातल्या परस्पर सहकार्याविषयी त्यांची बातचीत झाली. जागतिक आणि क्षेत्रीय महत्त्वाच्या मुद्द्यांवरही उभय नेत्यांमधे विचारांची देवाण घेवाण झाली. पुढच्या वर्षी फ्रान्समधे होणाऱ्या क...