August 8, 2024 1:21 PM

पृथ्वी निरीक्षक उपग्रह प्रक्षेपित करून इस्रो यंदाचा स्वातंत्र्य दिवस साजरा करणार

इस्रो, अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्था यंदाचा स्वातंत्र्य दिवस पृथ्वी निरीक्षक उपग्रह प्रक्षेपित करून साजरा करणार आहे. १५ ऑगस्ट रोजी श्रीहरीकोटा इथून सकाळी ९ वाजून १७ मिनिटांनी इस्रोनं विकसित केलेला लघु उपग्रह प्रक्षेपकाच्या सहाय्यानं  EoS 08 हा पृथ्वी निरीक्षक उपग्रह अवकाशात सोडला जाईल. त्यानंतर तो पृथ्वीच्या कक्षेत स्थिरावेल. हा उपग्रह आपत्ती निरीक्षण,  रिमोट सेन्सिंग, आग आणि पूर शोध आणि अतिनील किरण मापनासाठी उपयुक्त असलेल्या प्रगत तंत्रज्ञानानं सुसज्ज आहे.  उपग्रह प्रक्षेपणासाठी वापरला जाण...