August 4, 2024 1:58 PM

दहशतवादी गटाकडून इस्राएलमधल्या बीट हिलेल शहरावर हल्ला

हिजबुल्लाह या लेबनॉन मध्ये सक्रिय असलेल्या दहशतवादी गटानं काल रात्री इस्राएलमधल्या बीट हिलेल शहरावर हल्ला केला. हिजबुल्लाह गटाला इराणचं पाठबळ असून पॅलेस्टाइनी नागरिकांच्या विरुद्ध इस्राइलनं केलेल्या हल्ल्याला तसंच इस्राइलनं केफर केला आणि देर सिरियान या लेबनीज शहरांवर केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून हे पाऊल उचलल्याचं हिजबुल्लाह गटाचं म्हणणं आहे. त्याआधी इस्राइलनं काल हिजबुल्लाह गटावर गोळीबार केला होता आणि आपल्या नियंत्रणाखाली असलेला पश्चिमी भाग आणि गाझा मध्ये एका शाळेवर हल्ला केला होता. या...

July 7, 2024 1:45 PM

इस्रायल हल्ल्यात १६ जणांचा मृत्यू ,अधिक जण जखमी

इस्रायलनं काल गाझा पट्टीतल्या एका शाळेच्या इमारतीवर केलेल्या हवाई हल्ल्यात १६ जणांचा मृत्यू झाला तर ५० हून अधिक जण जखमी झाले आहेत. या इमारतीमध्ये हजारो विस्थापित लोक राहत होते, असं गाझाच्या आरोग्य मंत्रालयानं सांगितलं. तर या शाळेच्या परिसरात लपलेल्या दहशतवाद्यांना ठार केलं असल्याचं इस्रायलच्या संरक्षण दलानं म्हटलं आहे. इस्त्रायलविरुद्ध दहशतवादी हल्ल्यांसाठी मानवी ढाल म्हणून नागरी संरचना आणि लोकसंख्येचे शोषण करून हमासनं आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन केल्याचा आरोपही इस्रायलनं केला आहे.