August 22, 2024 12:51 PM

गाझा पट्टीतून सैन्य माघारी घेणार असल्याचं वृत्त इस्रायलने फेटाळलं

हमास संघटनेसोबतच्या संभाव्य युद्धविरामाच्या पार्श्वभूमीवर इस्रायल गाझा पट्टीतून सैन्य माघारी घेणार असल्याचं वृत्त इस्रायलच्या प्रधानमंत्री कार्यालयानं फेटाळलं आहे. इस्रायल फिलाडेल्फी कॉरिडोरमधून लष्कर माघारी घेण्यासाठी बेंजामीन नेत्यान्याहू तयार असल्याचं वक्तव्य अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी सोमवारी केलं होतं. त्यानंतर नेत्यान्याहू यांच्या कार्यालयानं हे स्पष्टीकरण दिलं आहे.

August 16, 2024 8:04 PM

इस्राएलचे प्रधानमंत्री बेंजामीन नेतन्याहू यांचा प्रधानमंत्री मोदी यांच्याशी संवाद

इस्राएलचे प्रधानमंत्री बेंजामीन नेतन्याहू यांनी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधला आणि पश्चिम आशियातल्या सद्य स्थितीबाबत चर्चा केली. सध्याचा तणाव कमी करणं गरजेचं आहे, असं मोदी यांनी यावेळी सांगितलं. सर्व बंदीवानांची तात्काळ सुटका करण्याचं आवाहन त्यांनी केलं. संवाद आणि राजनितीक मार्गानं संघर्षावर लवकर आणि शांततापूर्व तोडगा काढण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.    भारत-इस्राएल धोरणात्मक भागिदारी अधिक मजबूत करण्यासाठी तसंच उभयपक्षी सहकार्याच्या विविध बाजूंवर दोन्ही ने...

August 10, 2024 8:25 PM

इस्रायलने गाझापट्टीवर केलेल्या हवाई हल्ल्यात ९३ पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू

इस्रायलने गाझापट्टीवर केलेल्या हवाई हल्ल्यात ९३ पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला. हल्ला झालेला भाग गाझाच्या पूर्वेला आहे. या भागात विस्थापितांनी आश्रय घेतला असून पहाटेच्या प्रार्थनेच्या वेळी हा हल्ला झाल्याची माहिती गाझाच्या स्थानिक सुरक्षा संस्थेनं दिली आहे. हमासच्या दहशतवाद्यांना ठार करण्यासाठी हा हल्ला केल्याची माहिती इस्रायलच्या संरक्षण दलानं दिली आहे.

July 10, 2024 1:09 PM

इस्रायलने गाझापट्टीतल्या शाळेवर केलेल्या हल्ल्यात २५ पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू

इस्रायलने गाझापट्टीतल्या एका शाळेवर काल केलेल्या हल्ल्यात २५ पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला. या इमारतीत हजारो स्थलांतरितांनी आश्रय घेतला होता, असं हमासच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितलं.    या हल्ल्यात किती नागरिकांचा मृत्यू झाला याची माहिती घेत आहोत, असं इस्रायलच्या लष्कराने म्हटलं आहे. हा हवाई हल्ला हमास बंडखोरांसाठी करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला.