August 17, 2024 2:23 PM

२०२३-२४मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ अपेक्षेपेक्षा चांगली झाल्याचं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय उपसंचालक डॉ. गीता गोपीनाथ यांचं मत

आर्थिक वर्ष २०२३-२४मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ अपेक्षेपेक्षा खूप चांगली झाल्याचं मत, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या पहिल्या व्यवस्थापकीय उपसंचालक डॉ. गीता गोपीनाथ यांनी मांडलं आहे. २०२७पर्यंत भारत जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. येत्या ५ ते ६ वर्षांमध्ये देशात कोट्यवधी नवे रोजगार निर्माण करावे लागतील, असंही गोपीनाथ यांनी नमूद केलं. उत्पादनांचा व्यक्तिगत वापर पूर्वपदावर येण्याची आणि कृषी उत्पादन वाढण्यासाठी चांगला पाऊस होण्याची नाणेनिधीची अपेक्षा असल...

June 19, 2024 1:41 PM

आदिवासी समुदायाचं भारतीय अर्थव्यवस्थेत मोठं योगदान – उपराष्ट्रपती जगदीप धनखड

आदिवासी समुदायाचं भारतीय अर्थव्यवस्थेत मोठं योगदान असून आदिवासी आपली ओळख आहेत, असं प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं. मध्यप्रदेशातल्या दिंडोरी इथं जागतिक सिकल सेल निर्मूलन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते.   सिकलसेल आजाराचं निर्मूल करण्यासाठी सरकार कटिबद्ध असून २०४७ मध्ये भारत पूर्णपणे सिकलसेलमुक्त होईल, असा विश्वास उपराष्ट्रपतींनी यावेळी व्यक्त केला. तसंच आपल्या राज्यघटनेमध्ये आदिवासी समुदायासाठी अनेक विशेष तरतुदी असून त्याची पूर्तता करण्यात सरकारने कोणतीही कसर ठेव...