September 9, 2024 6:12 PM

राजस्थानमधल्या बिकानेरमध्ये भारत आणि अमेरिकन लष्कराचा संयुक्त युद्ध सराव सुरू

राजस्थानमधल्या बिकानेरमध्ये भारत आणि अमेरिकन लष्कराचा संयुक्त युद्ध सराव सुरू आहे. आज सकाळी साडे दहा वाजता परेडने सरावाला सुरुवात झाली. या सरावात भारताचे बाराशे सैनिक तसंच अमेरिकन लष्कराचे सैनिक सहभागी झाले आहेत. हा सराव पंधरा दिवस चालेल. या सरावा दरम्यान अमेरिकेच्या तोफखाना यंत्रणेचं प्रात्यक्षिण केलं जाणार आहे. दोन्ही लष्करांची क्षमता वाढवणं आणि गरज पडेल तेव्हा एकत्र काम करणं शक्य व्हावं यासाठी हा युद्ध सराव घेतला जात आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातल्या द्विपक्षीय लष्करी संबंधांच्या पार्श्वभूमी...

August 17, 2024 2:23 PM

२०२३-२४मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ अपेक्षेपेक्षा चांगली झाल्याचं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय उपसंचालक डॉ. गीता गोपीनाथ यांचं मत

आर्थिक वर्ष २०२३-२४मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ अपेक्षेपेक्षा खूप चांगली झाल्याचं मत, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या पहिल्या व्यवस्थापकीय उपसंचालक डॉ. गीता गोपीनाथ यांनी मांडलं आहे. २०२७पर्यंत भारत जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. येत्या ५ ते ६ वर्षांमध्ये देशात कोट्यवधी नवे रोजगार निर्माण करावे लागतील, असंही गोपीनाथ यांनी नमूद केलं. उत्पादनांचा व्यक्तिगत वापर पूर्वपदावर येण्याची आणि कृषी उत्पादन वाढण्यासाठी चांगला पाऊस होण्याची नाणेनिधीची अपेक्षा असल...