June 28, 2024 8:14 PM

भारत आणि टोगो या राष्ट्रांमध्ये उच्चस्तरीय बैठक

भारत आणि टोगो या दोन्ही राष्ट्रांमध्ये असलेल्या संबंधांचा आढावा घेण्यासाठी लोम इथे काल आणि आज उच्चस्तरीय बैठक झाली  आणि ते भविष्यात आणखी दृढ कसे होतील यावर चर्चा करण्यात आली. सामायिक स्वारस्याच्या क्षेत्रीय आणि जागतिक विषयांवर दोन्ही राष्ट्रांनी आपली मतं मांडली. १९६० साली टोगो देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारतानं त्यांना मान्यता दिली आहे.

June 28, 2024 8:00 PM

एफएटीएफच्या मूल्यमापन अहवालात भारताला नियमित पाठपुरावा श्रेणीत स्थान

मनीलाँड्रिंग आणि दहशतवादाला पैसा पुरवणं यामुळे तयार होणारे धोके टाळण्यासाठी भारतानं केलेल्या अथक प्रयत्नांची दखल घेत एफएटीएफ अर्थात फायनान्सिअल ॲक्शन टास्क फोर्सनं आपल्या परस्पर मूल्यमापन अहवालात भारताला नियमित पाठपुरावा श्रेणीत स्थान दिलं आहे. या कृती गटाच्या सिंगापूर इथं झालेल्या दोन दिवसीय बैठकीत हा अहवाल सादर करण्यात आला. आज या बैठकीचा समारोप झाला.    जी २० देशांपैकी फक्त इतर चार देशांना हा मान मिळाला आहे. रोखीनं होणारे व्यवहार ते डिजिटल अर्थव्यवस्थेकडे होणारं स्थित्यंतर तसंच जनधन, आधार...

June 24, 2024 5:13 PM

देशवासियांच्या जीवनमानात सुधारणा घडवण्यासाठी सरकार वचनबद्ध – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

एकशे चाळीस कोटी भारतीयांचं जीवनमान सुधारणं हीच रालोआ सरकारच्या लेखी खरी सुधारणा असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात केलं आहे. वस्तू आणि सेवा कर प्रणालीची अंमलबजावणी केल्यापासून अनेक गृहोपयोगी वस्तू स्वस्त झाल्या असून सामान्य माणसाच्या बचतीत भर पडली आहे. देशवासियांच्या जीवनमानात सुधारणा घडवण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे, असं ते म्हणाले. 

June 24, 2024 1:04 PM

भारतीय महिलांनी दक्षिण आफ्रिकेचा 6 गडी राखून केला पराभव

बंगळुरू इथल्या एम. चिन्नास्वामी मैदानावर काल झालेल्या पन्नास षटकांच्या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात भारतीय महिलांनी दक्षिण आफ्रिकेचा सहा गडी राखून पराभव केला आणि मालिका 3-0 अशी निर्विवादपणे जिंकली. अव्वल फिरकीपटू अष्टपैलू दीप्ती शर्मानं 27 धावांत दोन बळी घेत दक्षिण आफ्रिकेच्या महिलांना 215 धावांपर्यंत रोखले आणि त्यानंतर भरात असलेल्या स्मृती मांधानानं केवळ 83 चेंडूत 90 धावा करून, संघाला तिसऱ्या सामन्यात सहज विजय मिळवून दिला. तत्पूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घ...

June 23, 2024 8:01 PM

देशात १ जुलैपासून नव्या फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी

देशात फौजदारी कायद्यासंदर्भात करण्यात येणाऱ्या सुधारणांबाबत एक चर्चासत्र आज चेन्नईत झालं. भारतीय न्याय संहिता, भारतीय साक्ष्य अधिनियम, आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता या तीन नवीन कायद्यांची अंमलबजावणी येत्या १ जुलैपासून होणार असून त्यासंदर्भात प्रबोधन करण्यासाठी हे चर्चासत्र झालं. केंद्रीय कायदेमंत्री अर्जुन राम मेघवाल यांचं भाषण चर्चासत्रात झालं.    भारतीय दंड संहितेसारखे कायदे वसाहतवादी ब्रिटिश सरकारने केवळ भारतीयांना शिक्षा देण्यासाठी बनवले होते. आता सर्व राज्य सरकारं, केंद्रशासित प्रदे...

June 21, 2024 9:24 AM

टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा अफगाणिस्तानवर ४७ धावांनी विजय

आयसीसी टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सुपर एटमधील सामन्यात काल भारतानं अफगाणिस्तानचा ४७ धावांनी पराभव केला. बार्बाडोसमधील ब्रिजटाऊनच्या केन्सिंग्टन ओव्हल इथं झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतानं अफगाणिस्तानसमोर १८२ धावांचं आव्हान ठेवलं होतं, पण अफगाणिस्तानचा संघ निर्धारित २० षटकांत केवळ १३४ धावाच करू शकला. २८ चेंडूत ५३ धावा करणारा भारताचा सूर्यकुमार यादव सामनावीर ठरला.

June 21, 2024 11:29 AM

बांगलादेशच्या प्रधानमंत्री शेख हसीना दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर

बांग्लादेशच्या प्रधानमंत्री शेख हसिना आजपासून दोन दिवसाच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची त्या भेट घेणार असून, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासमवेत त्यांची द्विपक्षीय बैठक होईल. शेख हसीना परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांची देखील भेट घेणार आहेत.   नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर प्रथमच परदेशाच्या प्रधानमंत्री द्विपक्षीय चर्चेसाठी भारतात येत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि नवनिर्वाचित केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शपथविधीसाठीदेखील शेख हस...

June 19, 2024 7:47 PM

महिला क्रिकेट : तीन सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामन्यात भारत-दक्षिण आफ्रिकेत लढत

महिला क्रिकेटमधे भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानच्या तीन सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज बंगळुरु इथं सुरू आहे. भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना ३ बळींच्या मोबदल्यात ३२५ धावांचं आव्हान दक्षिण आफ्रिकेसमोर उभं केलं. शेवटची बातमी हाती आली तेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या संघाने २७ षटकात तीन बळींच्या मोबदल्यात १३७ धावा केल्या होत्या.  

June 19, 2024 2:53 PM

अमेरिकन व्यक्तीशी विवाह केलेल्या परंतु कायदेशीररित्या देशात राहण्याचा अधिकार नसलेल्यांसाठी नवी तरतूद

I अनेक स्थलांतरितांना नागरिकत्व देण्यासंदर्भात एक नवीन तरतूद अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी केली आहे. या तरतुदीमुळे सुमारे पाच लाख नागरिकांना मायदेशी परत पाठवलं जाणार नाही.   बायडेन यांनी मांडलेल्या प्रस्तावात अमेरिकेत किमान दहा वर्षे वास्तव्य केलेल्या आणि अमेरिकन व्यक्तीशी लग्न करुन अपत्यांना जन्म देणाऱ्या व्यक्तीला कायमस्वरुपी नागरिकत्व देण्याची शिफारस केली आहे.   बायडेन यांचा हा प्रस्ताव त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी मानले जाणारे रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांनी मांडलेल...

June 17, 2024 10:01 AM

महिला क्रिकेट : भारताचा दक्षिण आफ्रिकेवर १४३ धावांनी विजय

महिला क्रिकेटमधे बंगळुरु इथं झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेवर १४३ धावांनी विजय मिळवला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतानं स्मृती मंधानाच्या शतकी खेळीच्या बळावर निर्धारित षटकात आठ बाद २६५ धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ ३८ व्या षटकातच १२२ धावात सर्वबाद झाला.