August 15, 2024 3:44 PM

प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या दूरदृष्टीमुळे देशाच्या प्रगतीचा पाया रचला – नाना पटोले

शेतकरी, कामगार आणि जवानांनी हा देश उभा केला असून देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या दूरदृष्टीमुळे देशाच्या प्रगतीचा पाया रचला गेला, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. मुंबईत टिळक भवन मुख्यालयात नाना पटोले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. देशाच्या स्वातंत्र्यासाठी काँग्रेसने मोठा संघर्ष केला तसंच नेहरूंनी यासाठी अनेक वर्षे तुरुंगवास भोगला याची आठवणही पटोले यांनी करून दिली. 

August 14, 2024 8:12 PM

देशवासियांना संबोधित करताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून देशाच्या प्रगतीचा आढावा

राजकीय लोकशाहीच्या सातत्यपूर्ण प्रगतीमुळे सामाजिक लोकशाही अधिक दृढ व्हायला मदत होते, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. ७८ व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशवासियांना संबोधित करताना त्या बोलत होत्या. यासंदर्भातल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विधानाची आठवण करून देत राष्ट्रपतींनी सामाजिक लोकशाहीची गरज अधोरेखित केली. सामाजिक लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी सरकार विविध योजना राबवत असल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी राष्ट्रपतींनी देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दि...

August 13, 2024 8:10 PM

स्वातंत्र्य दिनासाठी लाल किल्ल्यावर ४०० पंचायती राज प्रतिनिधी आमंत्रित

केंद्र सरकारने येत्या १५ ऑगस्ट रोजी नवी दिल्लीतल्या स्वातंत्र्य दिन सोहळ्याला पंचायती राज संस्थांच्या निवडून आलेल्या चारशे प्रतिनिधींना विशेष पाहुणे म्हणून लाल किल्ल्यावर आमंत्रित केलं आहे. त्यात महिला प्रतिनिधींचा समावेश आहे. पंचायती राज मंत्रालयानं उद्या नवी दिल्लीत पंचायतींमधल्या महिला नेतृत्वाविषयीच्या कार्यशाळेचं आयोजन केलं आहे. पंचायतींमधल्या महिला लोकप्रतिनिधींसमोरची आव्हानं आणि स्थानिक प्रशासनात महिलांचा सहभाग वाढवणे या धोरणांवर कार्यशाळेत चर्चा होणार आहे. केंद्रीय पंचायत राज मंत्री राजी...