July 30, 2024 7:53 PM

महाराष्ट्रात येत्या २ दिवसात पावसाची शक्यता

येत्या २ दिवसात कोकण आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. किनारपट्टीवर सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडेल असा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

July 30, 2024 10:19 AM

येत्या 3 – 4 दिवसात भारताच्या वायव्य भागात मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता

येत्या 3 - 4 दिवसात भारताच्या वायव्यदेखील विविध राज्यांमध्ये मान्सून पुन्हा सक्रिय होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे . हिमाचल प्रदेश , उत्तराखंड , जम्मू काश्मीर , लडाख , पंजाब, हरियाणा, छत्तीसगड , दिल्ली, उत्तरप्रदेशचे आणि पश्चिम राजस्थानात सर्वदूर पाऊस पडण्याची शक्यता असून , तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पाऊस अपेक्षित आहे .   तसच येत्या 2 ऑगस्टपर्यंत कोकण , गोवा , मध्यप्रदेश , दक्षिण कर्नाटकातील दुर्गम भाग आणि किनारी प्रदेश आदि राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हव...

July 22, 2024 7:37 PM

रत्नागिरी आणि सातारा या जिल्ह्यांना उद्यासाठी रेड अलर्ट

राज्यात बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलंय, तर ठिकठिकाणी नदी नाल्यांचे प्रवाह फुगले आहेत.  राज्यातल्या १७ जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत सरासरीएवढा पाऊस पडला आहे. सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये यंदा सर्वाधिक पाऊस पडला असून, १२ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागानं कोकण, दक्षिण महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कुलाबा वेधशाळेनं रत्नागिरी आणि सातारा या जिल्ह्यांना उद्यासाठी रेड अलर्ट दिल...

July 21, 2024 12:59 PM

पुढील चार दिवसांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशात मुसळधार पावसाचा अंदाज

भारतीय हवामान विभागाने पुढील चार दिवसांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आज विदर्भ, छत्तीसगड, किनारी कर्नाटक, उत्तराखंड, पश्चिम उत्तर प्रदेश, हरियाणा, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, मराठवाडा, किनारी आंध्र प्रदेश, यानम आणि तेलंगणमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसच नवी दिल्लीमध्येही हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. राजस्थान, हिमाचल प्रदेश, पंजाब, बिहार, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये बुधवारपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान संस्थेने व...

July 5, 2024 2:55 PM

उत्तराखंड आणि ईशान्य भारतात येत्या 24 तासात अतिवृष्टीचा इशारा

उत्तराखंड आणि ईशान्य भारतात बहुतांश ठिकाणी येत्या चोवीस तासात अतिवृष्टीचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. जम्मू काश्मीर, लडाख, गिलगिट, बाल्टीस्तान, हिमाचल, पंजाब, हरयाणा, चंदीगढ, राजस्थान, उत्तर प्रदेश तसंच छत्तीसगढ मध्येही पुढील तीन चार दिवसात जोरदार पाऊस पडेल असा अंदाज विभागानं दिला आहे.महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटकच्या किनारपट्टी भागात येत्या तीन ते चार दिवस जोरदार पाऊस होण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.

June 28, 2024 11:54 AM

नैऋत्य मोसमी पावसाची उत्तरेकडे वाटचाल सुरू

नैऋत्य मोसमी पावसाने उत्तरेकडे वाटचाल सुरू केली आहे. संपूर्ण अरबी समुद्र, राजस्थान, पश्चिम उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, बिहार, जम्मू काश्मीर लडाख, गिलगिट बाल्टिस्तानचा बहुतांश भाग, पंजाब, पूर्व उत्तरप्रदेशच्या काही भागात मान्सूनची आगेकूच झाली आहे. येत्या दोन तीन दिवसांत देशाच्या बहुतांश भागात मान्सून दाखल होण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झालं आहे. दरम्यान, दिल्ली आणि आसपासच्या परिसरात काल सकाळी पावसाच्या सरी बरसल्या.

June 16, 2024 3:08 PM

महाराष्ट्र आणि गोव्यात अनेक ठिकाणी पुढले चार दिवस ४० किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता

उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, बिहार आणि झारखंड इथं पुढले दोन दिवस उष्णतेची तीव्र लाट राहण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. हिमाचल प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि उत्तराखंडमध्येही उष्णतेची लाट राहील. महाराष्ट्र आणि गोव्यात अनेक ठिकाणी पुढले चार दिवस, ताशी ४० किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची तसंच विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिणेकडच्या राज्यात पुढले पाच दिवस हीच स्थिती राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर ईशान्य...

June 13, 2024 7:52 PM

राज्यात मोसमी पावसासाठी अनुकूल परिस्थिती

नैऋत्य मोसमी पाऊस पुढच्या तीन चार दिवसात राज्याच्या आणखी काही भागात दाखल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे.    येत्या दोन दिवसात कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे.   गेल्या चोवीस तासात कोकणात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडला.