September 25, 2024 8:05 PM

क्रिकेट फलंदाजी मानांकनात भारताच्या दोन खेळाडूंना पहिल्या दहा खेळाडूत स्थान

कसोटी क्रिकेट फलंदाजी मानांकनात भारताच्या यशस्वी जयस्वाल आणि रिषभ पंत या दोघांनी पहिल्या दहा खेळाडूत स्थान मिळवलं आहे. ७५१ गुणांसह जयस्वालनं पाचवं तर पंतनं ७३१ गुणांसह सहावं स्थान पटकावलं आहे. चेन्नईत बांगलादेशाविरुद्धच्या सामन्यात भारताच्या विजयात या दोघांचा सिंहाचा वाटा होता. 

August 28, 2024 1:00 PM

जय शाह यांची ICCच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे विद्यमान सचिव जय शाह यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद - ICC च्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. अध्यक्षपदासाठी शहा हे एकमेव उमेदवार होते. यावर्षी 1 डिसेंबर रोजी ते आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारतील. 35 वर्षांचे शाह हे पद भूषवणारे सर्वात तरुण उमेदवार आहेत. ICC चे विद्यमान अध्यक्ष ग्रेग बर्कले यांनी तिसऱ्यांदा हे पद स्वीकारणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं.  यावर्षी नोव्हेंबर मध्ये ते सेवानिवृत्त होतील.

July 10, 2024 3:12 PM

जसप्रीत बुमराह आणि स्मृती मन्धाना आयसीसीचे जून महिन्यातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू

आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेचा सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहुमान जून २०२४ करता जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना या भारतीय क्रिकेटपटूंनी मिळवला आहे.  नुकत्याच झालेल्या टी२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत बुमराहच्या गोलंदाजीमुळे भारतीय संघाला विश्वचषकाला गवसणी घालता आली. या स्पर्धेतल्या ८ सामन्यात मिळून बुमराहनं १५ गडी बाद केले. महिला क्रिकेटपटू स्मृती मान्धना हिनं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात केलेल्या नेत्रदीपक कामगिरीबद्दल तिला हा बहुमान मिळाला आहे. तिनं इंग्लंडच्या माईया बौशेअर आणि श्रीलंकेच्या विश...