September 16, 2024 9:59 AM

चौथ्या हॉकी इंडिया आंतरविभागीय अजिंक्यपद स्पर्धेत पेट्रोलियम क्रिडा प्रोत्साहन मंडळ संघाला जेतेपद

  पुण्यात झालेल्या वरिष्ठ पुरुष गटाच्या चौथ्या हॉकी इंडिया आंतरविभागीय राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डने विजेतेपद राखलं. सलग दुसऱ्यांदा त्यांनी जेतेपदावर नाव कोरलं. गेल्या वेळी उपविजेता ठरलेल्या रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड संघाचा पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डने पेनल्टी शूटआउटवर 3-2 असा पराभव केला.   सुमीत कुमार, शिलानंद लाक्रा तसंच कर्णधार देविंदर वाल्मिकीने गोल केले. तत्पूर्वी तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत सेवा क्रीडा नियामक मंडळ संघाने भा...

September 14, 2024 9:45 AM

आशियाई चषक हॉकी स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान संघ आमने-सामने

चीनमध्ये सुरू असलेल्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान संघांत सामना होणार आहे. या स्पर्धेतील भारताचा हा पाचवा आणि अंतिम साखळी सामना आहे. यापूर्वी भारतीय संघाने चीन, जपान, मलेशिया आणि कोरिया संघांना नमवून गुणतालिकेत पहिलं स्थान मिळवत उपांत्य फेरीतील आपलं स्थान निश्चित केलं आहे. गुणतालिकेत पाकिस्तान दुसऱ्या स्थानावर आहे.

September 12, 2024 7:08 PM

आशियाई पुरूष हॉकी स्पर्धेत भारताचा कोरियाला पराभव करत सलग चौथा विजय

चीनच्या हुलनबुइर इथं सुरू असलेल्या आशियाई पुरूष हॉकी स्पर्धेत आज भारतानं दक्षिण कोरियाला नमवत सलग चौथा विजय नोंदवला जिंकले. भारतानं दक्षिण कोरियाचा ३-१ अशा गोलफरकानं पराभव केला. अराईजीत सिंग हुंदाल आणि कर्णधार  हरमनप्रीत सिंगच्या यांनी भारतासाठी गोल केले.  काल मलेशियाचा ८-१ असा दणदणीत पराभव करत, याआधीच भारत उपांत्य फेरीत दाखल झाला आहे. भारतीय संघ सध्या गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. गुणतालिकेतले पहिले चार संघ १६ सप्टेंबरला उपांत्य सामने खेळतील, तर अंतिम सामना १७ तारखेला होईल. भारतानं या स्पर्धेचं ...

September 11, 2024 8:32 PM

भारतीय संघ आशियाई अजिंक्यपद हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल

भारतीय संघ आशियाई अजिंक्यपद हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल झाला आहे. चीनमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत आज उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत भारताने गतविजेत्या मलेशियावर आठ विरूद्ध एक असा दणदणीत विजय मिळवला. राजकुमार पालने तीन, अराईजीतसिंह हुंडल ने दोन, तर जुगराजसिंह, हरमनप्रीत सिंह आणि उत्तमसिंह यांनी प्रत्येकी एक गोल केला. भारताचा पुढचा सामना येत्या शनिवारी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत होणार आहे.  

August 4, 2024 7:23 PM

पॅरिस ऑलिम्पिक : पुरुष हॉकीच्या उपांत्यपूर्व फेरीत ग्रेट ब्रिटनवर मात करत भारताची उपांत्य फेरीत धडक

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज पुरुष हॉकीच्या उपांत्यपूर्व फेरीत ग्रेट ब्रिटनचा पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-२ अशा गोलफरकानं पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. बॅडमिंटनमध्ये मात्र भारताच्या लक्ष्य सेनला उपांत्य फेरीत टोक्यो ऑलिम्पिकचा सुवर्णपदक विजेता व्हिक्टर ॲक्सेलसेन याच्याकडून थेट गेम्समध्ये पराभव पत्करावा लागला. दुसरीकडे महिलांच्या मुष्टियुद्ध स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत ७५ किलो वजनी गटात चीनच्या ली क्वियान हिनं टोक्यो ऑलिम्पिकची पदकविजेती लोव्हलीना बोर्गोहाइन हिचा ४-१ असा पराभव केला. नेमबाजीत २५ मीटर ...