September 9, 2024 5:59 PM

हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे दोन दिवसांत पंचनामे पूर्ण करून अहवाल पाठवण्याच्या मंत्री अनिल पाटील यांच्या सूचना

हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे दोन दिवसांत पंचनामे पूर्ण करून विभागीय आयुक्तांमार्फत अहवाल पाठवण्याच्या सूचना  मदत आणि पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिले. वसमत तालुक्यातील माळवटा, किन्होळा आणि कुरूंदा इथल्या अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या  भागाची पाहणी पाटील यांनी केली, त्यावेळी ते बोलत होते. 

September 1, 2024 3:18 PM

हिंगोली जिल्ह्यात आजपासून जमावबंदीचे आदेश लागू

हिंगोली जिल्ह्यात आजपासून जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. राज्यात विविध मुद्यांवरून सुरू असलेली आंदोलनं, राजकीय सभा यांच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं हिंगोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. जमावबंदीचे आदेश १२ सप्टेंबरपर्यंत लागू राहणार आहेत. 

July 23, 2024 7:43 PM

हिंगोली जिल्हा रुग्णालयातल्या बालरोग विभागाला राज्यातला पहिला राष्ट्रीय गुणवत्ता पुरस्कार जाहीर

हिंगोलीच्या जिल्हा रुग्णालयातल्या बालरोग विभागाला महाराष्ट्र राज्यातला पहिला राष्ट्रीय गुणवत्ता पुरस्कार जाहीर झाला आहे. राष्ट्रीय आरोग्य संशोधन केंद्र अंतर्गत आणि केंद्रीय कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने नॅशनल क्वालिटी ॲशोरन्स अंतर्गत केलेल्या परीक्षणाद्वारे हिंगोली जिल्हा रुग्णालयातील बालरोग विभागाला' राष्ट्रीय गुणवत्ता पुरस्कार' जाहीर करण्यात आला. येत्या स्वातंत्र्य दिनी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.