September 23, 2024 8:24 PM

लेबननमध्ये आज सकाळपासून इस्रायलनं केलेल्या हल्ल्यांमध्ये किमान १८२ जण ठार

लेबननमध्ये आज सकाळपासून इस्रायलनं केलेल्या हल्ल्यांमध्ये किमान १८२ जण ठार झाले असून ७२७ जण जखमी झाले आहेत. यात बालकं, महिला, आणि आरोग्यसेवकांचा समावेश असल्याचं लेबननच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं. लेबननमधल्या ३०० ठिकाणांवर हल्ले केल्याची माहिती इस्रायली सैन्यानं दिली आहे.    दुसऱ्या बाजूला, हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेनं इस्रायलच्या उत्तर भागातल्या लष्करी तळांवर आणि रसद गोदामांवर क्षेपणास्त्र डागली आहेत. इस्रायलनं केलेल्या हवाई हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हा हल्ला केल्याचं हिजबुल्लाहनं म...

August 25, 2024 8:15 PM

इस्रायलवर हिजबुल्लाह संघटनेकडून क्षेपणास्त्रांचा हल्ला

हिजबुल्लाह या लेबनॉनमधल्या दहशतवादी संघटनेनं आज सकाळी इस्रायलवर हल्ला सुरू केला. त्यांचा लष्करी नेता फौद शुकुर याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी हा हल्ला असल्याचं हिजबुल्लाहनं म्हटलं आहे. ३० जुलै रोजी बैरुत इथं शुकुर याची हत्या झाली होती. हिजबुल्लाहनं इस्रायलवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा मारा केला आहे.     दरम्यान, हिजबुल्लाहनं हल्ला करण्याआधीच आपण शंभर लढाऊ विमानांच्या सहाय्यानं हल्ला केल्याचं इस्रायली लष्करानं म्हटलं आहे. हिजबुल्लाहनं इस्रायलवर मोठ्या हल्ल्याची योजना आखल्याचं लक्षात आल्यामुळ...