August 22, 2024 1:29 PM

त्रिपुरातील अनेक भागांमध्ये पूरपरिस्थिती, आजही मुसळधार पावसाचा इशारा

त्रिपुरात सतत होणाऱ्या पावसामुळं राज्यातल्या अनेक भागांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली असून भारतीय हवामान विभागानं आजही मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. गोमती आणि मुहुरी या मुख्य नद्यांनी धोक्याची पातळी ओंलाडली असल्यानं शेकडो हेक्टर क्षेत्रावरल्या पिकांची नासाडी झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला.    मुख्यमंत्री डॉ. माणिक साहा यांनी आगरतळा इथल्या पूरग्रस्त भागांची पाहणी केली असून परिस्थितीचा आढावा घेतला.

August 8, 2024 2:29 PM

जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि राजस्थान मध्ये मुसळधार पावसाची शक्यता

  भारतीय हवामान विभागानं देशाच्या पूर्व, पश्चिम, मध्य, वायव्य आणि ईशान्य भागात विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पुढल्या ५ दिवसांत देशाच्या दक्षिण भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल तर कर्नाटकच्या किनारपट्टीवर आज मुसळधार पावसाची शक्यता आहे.   हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि जम्मू-काश्मीरमध्ये शनिवारपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. झारखंड, उत्तर ओदिशा, छत्तीसगडमध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता असल्...

August 3, 2024 1:22 PM

मुंबई मध्ये सकाळपासून पावसाची संततधार सुरू

मुंबई शहर आणि उपनगरात सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. काही ठिकाणी सखल भागात पाणी साचल्यानं वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे. उपनगरी रेल्वे गाड्या नियमित वेळेत धावत आहेत.   मुंबई आणि ठाणे जिल्ह्याला हवामान विभागानं आज जोरदार पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. रायगड, पुणे, रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.   दरम्यान, हवामान विभागानं सातारा जिल्ह्याला अति मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे.   

July 27, 2024 9:50 AM

कोल्हापूर जिल्ह्यात महापुराचं संकट

  कोल्हापूर शहरातील पूरबाधित भागात पाणी घुसू लागलं असून, नागरिकांचं स्थलांतर सुरू आहे. दूध, भाजीपाला वाहतूक ठप्प झाली आहे. अधून मधून कोसळणाऱ्या सरी वगळता पावसाचा जोर कमी झाला असला तरी पुराचा विळखा‌ अद्याप कायम आहे. यामुळे २६५ मालमत्तांची पडझड झाली असून जिल्ह्यात आज पर्यंत ९८.६२ लाख रुपयांचं नुकसान नुकसान झाल्याची माहितीजिल्हा प्रशासनानं दिली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात एनडीआरएफ चे एक पथक या पूर्वीच दाखल झाले असून आणखी एक पथक आज दाखल होणार आहे. आगामी १० दिवस कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस राहणार असून...

July 20, 2024 7:32 PM

राज्यात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी

राज्यात आज अनेक जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली. रायगड, साताऱ्यातील घाट परिसर, नागपूर, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यासाठी आज हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केला आहे.   रायगड जिल्ह्यात सर्व नद्यांना पूर आले असून रोह्यात कुंडलिका नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. रोह्याजवळ भिसे खिंडीत दरड कोसळली आहे.   रत्नागिरी जिल्ह्यात भातलावण्या अंतिम टप्प्यात आल्या आहेत. दुर्गम भागातली गावं सोडून चिखलणी शेतीच्या अनेक कामांसाठी पॉवर टिलरचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जाऊ लागला आहे.   विदर्भात अ...

July 20, 2024 11:24 AM

गुजरात, कोकण, गोवा आणि कर्नाटक किनारपट्टीवर अतीवृष्टीचा हवामान विभागाचा इशारा

भारतीय हवामान खात्याने आज गुजरात, कोकण, गोवा, कर्नाटक किनारपट्टी आणि कर्नाटकच्या दक्षिणेकडील अंतर्गत भागात अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. केरळ, तेलंगणा, किनारी आंध्र प्रदेश, ओडिशा, विदर्भ, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश मध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.     तसंच मध्य महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या दक्षिणेकडील अंतर्गत भागात आगामी 4 दिवसांत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज आहे. दरम्यान, आज झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये गंगेच्या प्रदेशात आणि हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, ...