September 2, 2024 7:18 PM

आंध्रप्रदेश, तेलंगण आणि महाराष्ट्रात जोरदार पावसामुळे पूरस्थिती

देशाच्या विविध भागात पावसाचा जोर असून ठिकठिकाणी नद्यांचे प्रवाह फुगले आहेत. तेलंगण, आंध्रप्रदेश आणि महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. परभणी जिल्ह्यात करापरा नदीला पूर आल्याने जिंतूर तालुक्यातल्या अनेक गावांना पुराचा वेढा बसला आहे.  अनेक घरांमध्ये पाणी आल्याने जनजीवन विस्कळित झालं असून ,सोयाबीन कापूस पिकात पाणी साचल्याने नुकसान झालं आहे.  परभणी - जिंतूर महामार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. सेलू इथं पूरस्थिती निर्माण झाली असून उपआयुक्तांनी लष्कराला मदतीसाठी पाचारण केलं आहे. ६० सैनि...

September 1, 2024 8:16 PM

गुजरातमध्ये पूरग्रस्त भागाचा आढावा घेण्यासाठी आंतरमंत्रालयीन केंद्रीय पथकाची स्थापना

गुजरातमधे पाऊस आणि पुरानं झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयानं राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेच्या कार्यकारी संचालकांच्या नेतृत्वाखाली आंतरमंत्रालयीन केंद्रीय पथकाची स्थापना केली असून हे पथक लवकरच राज्यातल्या पूरग्रस्त जिल्ह्यांना भेट देणार आहे.   यावर्षी गृह मंत्रालयानं विविध राज्यांसाठी आंतरमंत्रालयीन केंद्रीय पथकांची स्थापना केली असून या पथकानं आसाम केरळ मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये झालेल्या नुकसानीचं जागेवरच मूल्यांकन करण्यासाठी त्या राज्यांकडून मदतीची ...

September 1, 2024 7:16 PM

राज्यात अनेक भागात पुन्हा पावसाचा जोर

राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे. आजही राज्यात अनेक भागात मुसळधार आणि अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब्याच्या पट्ट्याची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे राज्यातल्या हवामानात मोठा बदल झाला असून पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे राज्यात येत्या तीन दिवसांत बहुतांश भागात जोरदार पाऊस होईल. मध्य-महाराष्ट्रातही पावसाची शक्यता असून, घाटमाथ्यावरदेखील पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. साधारणत: ३ सप्टेंबर ते ५ सप्टें...

August 29, 2024 1:51 PM

देशात विविध ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज

दिल्लीच्या काही भागात काल रात्री मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस पडला असून गुजरातच्या सौराष्ट्र आणि कच्छ जिल्ह्यांमध्ये उद्यापर्यंत मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. तसंच गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. बंगाल उपसागराच्या उत्तर आणि लगतच्या मध्य भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता असून पश्चिमेकडील ओडीसाच्या दक्षिणेकडे आणि आंध्र प्रदेशच्या उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे. गुजरात आणि उत्तर महाराष्ट्र किनाऱ्यावर म...

August 26, 2024 9:06 PM

राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस

राज्यात आजही विविध जिल्ह्यात जोरदार पावसाची नोंद झाली आहे.  नंदूरबार जिल्ह्यातल्या शहादा शहरात मुसळधार पाऊस झाला असून सुसरी धरणातून गोमाई नदीत विसर्ग सुरु आहे. गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक तालुक्यातल्या शेतांमध्ये पाणी शिरलं असून तीन जण वाहून गेले आहेत. यात अक्कलकुवा तालुक्यातल्या दोन, तर अक्राणी तालुक्यातल्या एकाचा समावेश आहे. पावसामुळे जिल्ह्यातल्या ४२ घरांची पडझड झाली आहे. पावसामुळे जिल्ह्यातल्या केळी, पपई आणि कापसाच्या पिकाला धोका निर्माण झाला आहे.  नाशिक ...

August 26, 2024 1:40 PM

पुढील तीन दिवसांत देशातील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज

भारतीय हवामान विभागानं पुढील तीन दिवसांत  महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात,आणि गोव्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मध्य प्रदेशच्या वायव्य भागात आणि  राजस्थानच्या पूर्व भागात  कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून आज मध्य प्रदेशात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसंच पुढील तीन दिवसांत पूर्व आणि दक्षिण राजस्थान, गुजरात, सौराष्ट्र आणि कच्छमध्येही हीच परिस्थिती राहण्याचा अंदाज आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, ओडिशा, पश्चिम बंगालमधल्या गंगेच्या खोऱ्यात, तसंच  झारखंडमध्येही पुढील...

August 25, 2024 7:12 PM

राज्यात जोरदार पावसामुळे विविध धरणांमधून विसर्ग सुरु

राज्यात विविध ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु असून बहुतांश धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे.    नवी मुंबई महानगरपालिकेला पाणी पुरवठा करणाऱ्या मोरबे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली असल्यानं धरणातलं अतिरिक्त पाणी धावरी नदीत सोडलं जाईल, असं नवी मुंबई महानगरपालिकेनं सांगितलं आहे. त्यामुळे धावरी आणि पाताळगंगा नदीजवळच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.     पालघर जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू आहे. सततच्या पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.   नाशिक जिल्ह्यात गंगापूर धरणातून ८ ...

August 25, 2024 1:53 PM

महाराष्ट्राच्या अनेक भागात संततधार पाऊस

महाराष्ट्रात मुंबईसह अनेक भागात आज संततधार पाऊस सुरू आहे. राज्यातल्या पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट हवामान विभागानं जारी केला आहे. मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे.    राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात, आसाम आणि मेघालय या राज्यांमध्ये अति मुसळधार पाऊस पडणार असल्याचं हवामान विभागानं कळवलं आहे. उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणामध्येही जोरदार पावसाची शक्यता आहे.

August 21, 2024 8:56 AM

मराठवाड्यात गेल्या दोन दिवसात जोरदार पाऊस

मराठवाड्यात गेल्या दोन दिवसात सात जिल्ह्यातल्या २२ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. आतापर्यंत विभागात ७३ पूर्णांक पाच मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात काल चांगला पाऊस झाला. दुपारी काही वेळ मुसळधार पाऊस झाल्यानंतर रात्रभर पावसाची संततधार सुरु होती. जिल्ह्यातल्या तुर्काबाद, चिकलठाण्यासह जालना, बीड, धाराशिव, नांदेड जिल्ह्यातल्या अनेक भागात काल जोरदार पाऊस झाला.   दरम्यान, येत्या दोन दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी, तर मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठ...

August 20, 2024 1:52 PM

येत्या चार दिवसात देशात मुसळधार पावसाचा अंदाज

देशाच्या विविध भागात मोसमी पाऊस पुन्हा सक्रीय झाला असून येत्या चार दिवसात देशाच्या पूर्व,पश्चिम, वायव्य भागात तसंच मध्य भारतात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. याशिवाय दक्षिणेकडील द्विपकल्प भागातही उद्यापर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.  तसंच जम्मू, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेशातही येत्या २३ तारखेपर्यंत जोरदार पावसाची शक्यता असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे. मध्य प्रदेशच्या ९ जिल्ह्यांमधे जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हिमाचल प्रदेशा...