September 9, 2024 8:14 PM

कर्करोगावरची औषधं आणि नमकीन पदार्थांवरच्या जीएसटीमध्ये कपात

कर्करोगावरच्या औषधांवरचा जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर १२ वरुन ५ टक्के करण्याचा निर्णय आज झाला. नमकीन आणि इतर पदार्थांवर १८ टक्क्यांऐवजी १२ टक्के जीएसटी लादण्याचा निर्णय झाल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. जीएसटी परिषदेच्या आज नवी दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर त्या बोलत होत्या.  आरोग्य वीम्यावर लादलेला १८ टक्के जीएसटी कमी करण्याची मागणीवर नोव्हेंबरमध्ये निर्णय घेतला जाईल, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे. हा मुद्दा मंत्र्यांच्या समुहाकडे ...

September 2, 2024 1:14 PM

वस्तू आणि सेवा कर संकलनात ऑगस्ट महिन्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत १० टक्के वाढ

  वस्तू आणि सेवा कर संकलनात ऑगस्ट महिन्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत १० टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात एक कोटी ५९ लाख रुपये संकलन झालं होतं, तर यंदा ही रक्कम एक कोटी ७५ लाख रुपये असल्याचं सरकारी आकडेवारी दाखवते.   जीएसटी अंतर्गत करदात्यांना परतावा देण्यापूर्वी केंद्र सरकारने ३० हजार ८६२ कोटी रुपये जमा केले, तर राज्यांनी ३८ हजार ४११ कोटी रुपये जमा केले आहेत. आयात आणि आंतरराज्य विक्रीवरच्या एकात्मिक वस्तू आणि सेवा कराचं संकलन ९३ हजार ६२१ कोटी रुपये इतकं होतं.  

August 2, 2024 2:23 PM

जीएसटी संकलनात जुलै महिन्यात गेल्या महिन्याच्या तुलनेत १० पूर्णांक ३ शतांश टक्के वाढ

जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवाकर संकलनात जुलै महिन्यात गेल्या महिन्याच्या तुलनेत १० पूर्णांक ३ शतांश टक्के वाढ झाली असून ते एक लाख ८२ हजार कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. जुलै महिन्यात करदात्यांचे परतावे दिल्यानंतर वस्तू आणि सेवाकराचं निव्वळ संकलन एक लाख ६० हजार कोटी रुपये इतकं आहे, जे १४ पूर्णांक ४ दशांश टक्क्यांनी वाढलं आहे. वित्त मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार एकूण परताव्यांमध्ये १६ हजार २८३ कोटी रुपयांची घट झाली असून हे प्रमाण १९ पूर्णांक ४ दशांश टक्के इतकं आहे. देशांतर्गत व्यवहारांमध्...

July 31, 2024 3:41 PM

आयुर्विमा आणि आरोग्य विमा योजनेवरचा जीएसटी रद्द करण्याची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना विनंती

आयुर्विमा आणि आरोग्य विमा योजनेवरचा जीएसटी रद्द करण्याची विनंती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहून केली आहे. नागपूरच्या आयुर्विमा महामंडळ कर्मचारी संघटनेकडून मिळालेल्या निवेदनानंतर त्यांनी हे पत्र लिहिलं आहे. जीवन विमा आणि वैद्यकीय विम्यावर १८ टक्के जीएसटी दर लागू होतो. जीवन विम्याच्या प्रीमियमवर जीएसटी लादणे म्हणजे जीवनाच्या अनिश्चिततेवर कर लादण्यासारखं असल्याचं त्यांनी पत्रात म्हटलं आहे.

June 23, 2024 10:12 AM

पोलाद, लोह आणि ॲल्युमिनियमपासून निर्मित दुधाच्या कॅनवर 12 टक्के एकसमान जीएसटी दराची शिफारस

वस्तु आणि सेवा कर परिषदेनं पोलाद, लोह आणि ॲल्युमिनियमपासून निर्मित दुधाच्या कॅनवर 12 टक्के वस्तु आणि सेवा कर म्हणजे जीएसटीच्या एकसमान दराची शिफारस केली आहे. नवी दिल्ली इथं काल झालेल्या ५३व्या वस्तु आणि सेवा कर परिषदेच्या बैठकीनंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी माध्यमांशी बोलताना, रेल्वे फलाट तिकिटं, विश्राम कक्ष आणि प्रतीक्षा कक्षाच्या सुविधांसाह भारतीय रेल्वेकडून सर्वसामान्य नागरिकांना पुरवल्या जाणाऱ्या सेवा तसच बॅटरीवर चालणाऱ्या कार सेवांवर कोणताही जीएसटी लागणार नाही अशी घोषणा केली. विविध ...