August 4, 2024 2:56 PM

सरकारी योजनांचे फायदे तळागाळातल्या नागरिकांपर्यंत पोहोचावेत, याकरता राज्यपालांनी पुढाकार घ्यावा – राष्ट्रपती

राज्यपालांच्या दोन दिवसीय परिषदेचा काल राष्ट्रपती भवनात समारोप झाला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एकमेकांच्या अनुभवातून शिकण्याच्या भावनेनं सर्वसमावेशक चर्चा करण्याच्या राज्यपालांच्या प्रयत्नांचं कौतुक केलं. सरकारी योजनांचे फायदे तळागाळातल्या नागरिकांपर्यंत पोहोचावेत, विशेषतः अनुसूचित जाती- जमाती आणि आदिवासींना या योजनांचा लाभ मिळावा याकरता राज्यपालांनी पुढाकार घ्यावा असं त्यांनी आपल्या समारोपाच्या भाषणात सांगितलं. आदर्श राज्याचा वस्तुपाठ प्रस्थापित करणं ही राज्यपालांची जबाबदारी असून प्रभावी ...

August 2, 2024 10:23 AM

प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत राज्यात १ कोटी ६५ लाख ७० हजार ४३७ पीकविमा अर्ज दाखल

प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत राज्यात १ कोटी ६५ लाख ७० हजार ४३७ पीकविमा अर्ज दाखल झाल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. दरम्यान, राज्यात जुलै अखेर सुमारे ९७ टक्के पेरणी पूर्ण झाली असून पीकविमा योजनेच्या माध्यमातून १ कोटी १० लाख ५५ हजार हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित करण्यात आलं आहे.

July 31, 2024 6:56 PM

राज्याचे नवे राज्यपाल म्हणून सी. पी. राधाकृष्णन यांचा शपथविधी

राज्याचे नवे राज्यपाल म्हणून सी. पी. राधाकृष्णन यांनी आज शपथ घेतली. मुंबईत राजभवनात आयोजित समारंभात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आणि अजीत पवार यांनी राज्यपाल राधाकृष्णन यांचं स्वागत केलं.   सी. पी. राधाकृष्णन याआधी झारखंडचे राज्यपाल होते. तमिळनाडूमधे भाजपा प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं होतं. कोईम्बतूर लोकसभा मतदारसंघातून ते दोनदा निवडू...

July 30, 2024 8:37 PM

राज्याचे मावळते राज्यपाल रमेश बैस यांना निरोप

राज्याचे मावळते राज्यपाल रमेश बैस यांना आज निरोप देण्यात आला. राजभवनात झालेल्या या निरोप सभारंभाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आणि अजित पवार, तसंच राजभवनातले अधिकारी - कर्मचारी उपस्थित होते.       नवनियुक्त राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांचा शपथविधी समारंभ उद्या संध्याकाळी साडेसहा वाजता राजभवनात होणार आहे.  

July 28, 2024 1:28 PM

महाराष्ट्राच्या राज्यपालपदी सी. पी. राधाकृष्णन यांची नियुक्ती

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी विविध राज्यांमध्ये नवीन राज्यपालांची नियुक्ती केली आहे. सध्याचे झारखंडचे राज्यपाल सी. पी.राधाकृष्णन यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती केली आहे. तर, महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष हरी भाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती केली आहे. तेलंगणात, त्रिपुराचे माजी उपमुख्यमंत्री जिष्णू देव वर्मा यांची, सिक्कीममधे माजी राज्यसभा खासदार ओमप्रकाश माथुर, झारखंडमधे माजी केंद्रीय मंत्री संतोष कुमार गंगवार, छत्तीसगडमधे माजी खासदार रामेन डेका, तर मेघालयात क...