August 4, 2024 2:56 PM

सरकारी योजनांचे फायदे तळागाळातल्या नागरिकांपर्यंत पोहोचावेत, याकरता राज्यपालांनी पुढाकार घ्यावा – राष्ट्रपती

राज्यपालांच्या दोन दिवसीय परिषदेचा काल राष्ट्रपती भवनात समारोप झाला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एकमेकांच्या अनुभवातून शिकण्याच्या भावनेनं सर्वसमावेशक चर्चा करण्याच्या राज्यपालांच्या प्रयत्नांचं कौतुक केलं. सरकारी योजनांचे फायदे तळागाळातल्या नागरिकांपर्यंत पोहोचावेत, विशेषतः अनुसूचित जाती- जमाती आणि आदिवासींना या योजनांचा लाभ मिळावा याकरता राज्यपालांनी पुढाकार घ्यावा असं त्यांनी आपल्या समारोपाच्या भाषणात सांगितलं. आदर्श राज्याचा वस्तुपाठ प्रस्थापित करणं ही राज्यपालांची जबाबदारी असून प्रभावी ...