September 15, 2024 6:45 PM

गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी पूर परिस्थितीची केली पाहणी

गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी आज जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीची पाहणी केली. नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे जिल्ह्यातल्या अनेक गावात पाणी शिरलं आहे आणि शेतीचंही मोठं नुकसान झालं आहे. पालकमंत्र्यांनी नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली आणि तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

September 12, 2024 10:43 AM

भंडारा-गोंदियाला अतिवृष्टीचा फटका

महाराष्ट्राच्या, भंडारा गोंदिया जिल्ह्यात काल ढग फुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे नदी, नाले ओसंडून वाहू लागले आणि अनेक गावांचा संपर्क तुटला. वैनगंगा नदीने धोका पातळी ओलांडली आहे. त्यामुळे गोसीखुर्द धरणाचे 27 दरवाजे दीड मीटरने तर 6 दरवाजे एक मीटरने उघडण्यात आली आहेत. दरम्यान वैनगंगा नदीवर पुलाच्या बांधकामात वापरण्यात येणारी क्रेन पुराच्या प्रवाहात वाहून गेली असून या क्रेनला आठ किलोमिटर अंतरावर पाण्याबाहेर काढण्यात यश आलं आहे.  

September 8, 2024 7:15 PM

विनोद अग्रवाल यांच्या घरावर गोंड गोवारी समाजाचा धडक मोर्चा

गोंड, गोवारी जमातींना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अनुसूचित जमातीचे सर्व लाभ पूर्ववत सुरू करण्याबाबत शासनानं सात दिवसात निर्णय घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन सुरु करु, असा इशारा या समाजानं दिला आहे. या मागणीसाठी गोंदिया जिल्ह्यात आज विनोद अग्रवाल यांच्या घरावर गोंड गोवारी समाजानं त्यांच्या धडक मोर्चा काढला.    १९८५ च्या शासन निर्णयातली गोंड, गोवारी जमातीविषयी चुकीची माहिती तात्काळ दुरुस्ती करुन हे लाभ पूर्ववत सुरू करावेत, सेवानिवृत्त न्यायाधीश के एल वडने सर समितीला दिलेली मुदतवाढ रद्द क...

July 17, 2024 7:49 PM

गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांत पावसामुळे शेतकरी सुखावला

गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांत पावसाच्या दमदार हजेरीनं शेतकरी सुखावला असून पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांनी पेरण्या सुरू केल्या आहेत.   गोंदिया जिल्ह्यात आज पावसानं दमदार हजेरी लावल्यानं भातपिकाला याचा मोठा फायदा झाला आहे. पाण्याच्या पंपाची सोय उपलब्ध नसलेल्या वरथेंब शेतकऱ्यांची पावसाची प्रतीक्षा संपली असून, भात रोवणीला सुरुवात झाल्याचं आमच्या बातमीदारानं कळवलं आहे.   भंडारा जिल्ह्यातही बऱ्याच प्रतीक्षेनंतर पावसाने मेघगर्जनेसह जोरदार हजेरी लावली आहे. तर पवनी तालुक्यात ...