September 21, 2024 1:23 PM

उत्तर प्रदेशात बस अपघातात ३८ प्रवासी जखमी

उत्तर प्रदेशात आग्रा लखनौ महामार्गावर खासगी बस दुभाजकाला धडकून उलटल्याने आज झालेल्या अपघातात ३८ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी चौघांची प्रकृती गंभीर आहे.   सर्व जखमींना रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे. या बसमध्ये ८० प्रवासी प्रवास करत होते. हे सर्व प्रवासी गोंडा इथले रहिवासी आहेत. मद्यधुंद चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.