September 12, 2024 9:28 AM

गणेशोत्सवासाठी आलेल्या चाकरमान्यांच्या परतीसाठी आजपासून एसटीच्या अडीच हजार फेऱ्यांचं नियोजन

गणेशोत्सवासाठी रत्नागिरी जिल्ह्यात आलेल्या चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासाकरिता राज्य परिवहन महामंडळानं आजपासून अडीच हजार बस गाड्यांच्या फेऱ्यांचं नियोजन केलं आहे. आजच्या गौरी-गणपती विसर्जनानंतर परतीच्या प्रवाशांमध्ये वाढ होईल, हे गृहीत धरून 12 ते 20 सप्टेंबर दरम्यान मुंबई, बोरीवली, ठाणे, पुणे आदी ठिकाणी जाणाऱ्या अतिरिक्त बसफेऱ्यांचं नियोजन करण्यात आलं आहे. ऑनलाइन आरक्षण सुरू असून, गट नोंदणीलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. गुहागर तालुक्यातून सर्वाधिक 208 गाड्यांची गट नोंदणी करण्यात आल्याची माहिती...

September 7, 2024 3:17 PM

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून भाविकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा

१४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती असणाऱ्या विघ्नहर्त्या गणपती बाप्पाचं आगमन भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या आजच्या दिवशी घरोघरी आणि सार्वजनिक मंडपांमध्ये मोठ्या उत्साहात झालं. महाराष्ट्राचं वैशिष्ट्य असलेला हा अनोखा उत्सव अनुभवण्यासाठी अनेक परदेशी पर्यटकांचं आगमनही मुंबई - पुण्यात झालं आहे. दहा दिवस चालणाऱ्या या उत्सव काळात राज्यात सुमारे ११ हजार कोटी रुपयांहून अधिक व्यापार होण्याची शक्यता व्यापारी संघटनांनी व्यक्त केली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आण...

September 5, 2024 3:45 PM

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिका सज्ज

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आगमन आणि विसर्जनासाठी मुंबई महानगरपालिका सज्ज झाली आहे. चौपाटयांसह गणेश विसर्जन स्‍थळे, कृत्रिम तलाव या ठिकाणी पालिकेच्या वतीने सर्व सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. यंदा ६९ नैसर्गिक स्थळांबरोबरच २०४ कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत. याशिवाय विभाग स्तरावर फिरती विसर्जन स्थळे, तसेच गणेश मूर्ती संकलन केंद्रे आदी सुविधा पुरविण्यात आल्या असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली

August 24, 2024 4:07 PM

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर जड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर १६ टन किंवा त्यापेक्षा जास्त वजनाच्या वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घातली आहे. ५ सप्टेंबरला मध्यरात्री १२ वाजल्यापासून ८ सप्टेंबरला रात्री ११ वाजेपर्यंत, ११ सप्टेंबरला रात्री ८ वाजल्यापासून १३ सप्टेंबरला रात्री ११ वाजेपर्यंत तर १७ सप्टेंबरला सकाळी ८ वाजल्यापासून १८ सप्टेंबरला रात्री ८ वाजेपर्यंत ही बंदी लागू असेल. या कालावधीत अत्यावश्यक वस्तू, खाद्यपदार्थ आणि इतर जीवनावश्यक मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांना या बंदीतून सूट मिळेल.

August 2, 2024 2:31 PM

मुंबईतल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मंडपांसाठीची परवानगी पत्रे ६ ऑगस्टपासून दिली जाणार

मुंबईतल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मंडपांसाठीची परवानगी पत्रे ६ ऑगस्टपासून दिली जाणार आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रसिद्धी पत्रकात ही माहिती देण्यात आली असून गणेश मंडळे महानगनपालिकेच्या यासाठी तयार करण्यात आलेल्या पोर्टवर जाऊन त्याची प्रक्रिया पूर्ण करु शकतील. ज्या मंडळांनी गेल्या दहा वर्षात परवानगीच्या सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत. त्यांना पुढील ५ वर्षांसाठी परवानगी देण्यात येणार असल्याची माहिती महानगरपालिकेनं प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात दिली आहे. त्यांना दरवर्षी त्यांच्या पर...

July 31, 2024 7:08 PM

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी !

गणपती उत्सवासाठी मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांकरता एसटी महामंडळानं यंदा २ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर दरम्यान ४ हजार ३०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, या विभागांमधल्या प्रमुख बसस्थानकांमधून या जादा गाड्या सोडल्या जाणार आहेत. या गाड्या आरक्षणासाठी npublic.msrtcors.com या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून, त्यांचं आरक्षण बसस्थानकावर, किंवा महामंडळाच्या MSRTC Bus Reservation ॲपद्वारे उपलब्ध होणार आहे.   गणेशोत्सवादरम्यान एसटीची वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी बसस्थान...

July 19, 2024 8:07 PM

कोकणात गणपतीक जाऊचा? रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

गणेशोत्सवाच्या काळात होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनानं १ ते १८ सप्टेंबर या काळात गणपती विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, मुंबई सीएसएमटी स्थानक ते सावंतवाडी आणि रत्नागिरी, लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी आणि कुडाळ, तसंच दिवा जंक्शन ते चिपळूण दरम्यान दोन्ही बाजूंनी या विशेष गाड्यांच्या फेऱ्या होतील, असं रेल्वेनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.           

July 19, 2024 3:20 PM

गणेशोत्सवाच्या काळात होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय

गणेशोत्सवाच्या काळात होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनानं १ ते १८ सप्टेंबर या काळात गणपती विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, मुंबई सीएसएमटी स्थानक ते सावंतवाडी आणि रत्नागिरी, लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी आणि कुडाळ,तसेच दिवा जंक्शन ते चिपळूण दरम्यान दोन्ही बाजूंनी या विशेष गाड्यांच्या फेऱ्या होतील, असं रेल्वेनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आ