June 15, 2024 11:24 AM
1
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची विविध राष्ट्रप्रमुखांबरोबर चर्चा
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जी-सात शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा केली. प्रधानमंत्र्यांनी काल दुपारी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेतली. संरक्षण, आण्विक, अवकाश, शिक्षण, हवामानविषयक तंत्रज्ञान, डिजिटल पायाभूत सुविधा, संस्कृती या क्षेत्रांमध्ये भागिदारी वाढवण्यासाठी काय करता येईल, याबाबत त्यांनी चर्चा केली. मेक इन इंडिया मोहिमेला बळ देण्यासाठी धोरणात्मक संरक्षण भागिदारी वाढवण्यावर त्यांचं एकमत झालं. फ्रान्समध्ये पुढील वर्षी होऊ घातलेल्या कृत्रिम ...