July 8, 2024 1:04 PM

फ्रान्सच्या सार्वत्रिक निवडणुकीचे एक्झिट पोल जाहीर

फ्रान्सच्या सार्वत्रिक निवडणुकीचे एक्झिट पोल जाहीर झाले असून यानुसार न्यू पॉप्युलर फ्रंट ही डावी आघाडी १७५ ते २०५ जागांवर विजय मिळवत सर्वात मोठी आघाडी म्हणून उदयाला येत आहे, तर इमॅन्युअल मॅक्राँ यांच्या नेतृत्वाखालची मध्यममार्गी एन्सेम्बल अलायन्स दीडशे ते १७५ जागांवर विजयी होण्याची शक्यता आहे. फ्रान्समधली अति उजवी आघाडी - नॅशनल रॅली तिसऱ्या स्थानावर फेकली गेली आहे. ही आघाडी ११५ ते दीडशे जागा जिंकेल. कोणत्याही आघाडीला स्पष्ट बहुमत मिळालं नसून त्रिशंकू अवस्था निर्माण झाली आहे.    मतदानाच्या य...

July 5, 2024 7:35 PM

विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी १२ उमेदवार रिंगणात

विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी मतदान होणार हे आज स्पष्ट झालं. अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी कुणीही अर्ज मागे न घेतल्यानं ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात आहेत. आता १२ जुलै रोजी मतदान होऊन त्याचदिवशी सायंकाळी मतमोजणी होणार आहे.   भाजपकडून पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर आणि अमित गोरखे रिंगणात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे, शिवसेनेकडून माजी खासदार कृपाल तुमाणे आणि भावना गवळी, काँग्रेसकडून प्रज्ञा सातव निवडणूक लढवत आहेत....

June 13, 2024 9:10 PM

views 1

राज्यसभेसाठी बिनविरोध निवडून येण्याचा सुनेत्रा पवार यांचा मार्ग मोकळा

राज्यसभा निवडणुकीसाठी बिनविरोध निवडून येण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार यांचा मार्ग मोकळा झाला आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत त्यांच्याशिवाय इतर कुणीही अर्ज भरलेला नाही. उद्या अर्जाची छाननी होईल, त्यानंतर त्यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा होऊ शकते.  प्रफुल्ल पटेल यांनी कालावधी पूर्ण होण्याआधीच राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिल्यानं ही निवडणूक होते आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत बुधवारी रात्री त्यांच्या नावावर सहमती झाली, त्यांच्या उमेदवारीव...