August 17, 2024 10:36 AM

भारत निवडणूक आयोगाकडून राज्यात यावर्षीच्या दुसऱ्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाची घोषणा

महाराष्ट्र राज्यात होणार असलेल्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगानं राज्यात यावर्षीच्या दुसऱ्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाची घोषणा केली आहे. या कार्यक्रमाअंतर्गत पात्र नवमतदारांच्या नोंदणीसह विद्यमान मतदारांसाठी मतदार यादीतील आपल्या तपशीलामध्ये बदल, दुरुस्त्या, अद्ययावतीकरण करता येणार आहे. मतदारांना मतदार यादीतील आपल्या नावासोबतच स्वतःचा मोबाईल क्रमांकही जोडता येणार आहे. यात मतदारांसाठी दावे आणि हरकतींसाठी २० ऑगस्ट २०२४ पर्यंतचा कालावधी निश्चित केला गेला आह...

August 17, 2024 10:35 AM

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राज्यातील काही पक्षांना निवडणूक चिन्हांचं वाटप

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगानं काही पक्षांना निवडणूक चिन्हांचं वाटप केलं. यामध्ये वंचित बहुजन आघाडीला गॅस सिलिंडर तर प्रहार जनशक्ती पक्षाला क्रिकेटची बॅट हे चिन्ह मिळालं आहे.

August 16, 2024 1:49 PM

नवी दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आज नवी दिल्ली इथं होणार आहे. या वेळी आयोग जम्मू काश्मीर आणि हरयाणातल्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुका घेण्याच्या दृष्टीने केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकताच या दोन राज्यांचा दौरा केला. महाराष्ट्र आणि झारखंडमधेही विधानसभांची मुदत संपत आली असून तिथेही निवडणुका अपेक्षित आहेत. 

June 21, 2024 2:56 PM

केंद्रीय निवडणूक आयोगाची आगामी विधानसभा निवडणुकांसाठी तयारी सुरू

केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्रासह हरयाणा, झारखंड आणि जम्मू काश्मीरमध्ये आगामी विधानसभा निवडणुकांसाठी तयारी सुरू केली आहे. हरयाणात ३ नोव्हेंबर रोजी, झारखंडमधे २६ नोव्हेंबर रोजी तर महाराष्ट्रात ५ जानेवारीला विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ संपत असल्यामुळे तिथं निवडणुका होत आहेत. तसंच जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातही विधानसभेसाठी निवडणूक होत आहे. मतदार यादीत अद्ययावत करण्यासाठी दुसऱ्या संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमासाठी १ जुलै २०२४ हा अर्हता दिवस आहे.