September 23, 2024 2:52 PM

निवडणूक आयोगाचं पथक २६ ते २८ सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्र दौऱ्यावर

निवडणूक आयोगाचं पथक २६ ते २८ सप्टेंबर या दरम्यान महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहे. या काळात राज्यातले विविध राजकीय पक्ष, राज्य निवडणूक आयोग, सुरक्षा यंत्रणा आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यासोबत आयोगाचं पथक बैठक घेणार  आहे. २८ सप्टेंबरला मुंबईत आयोगाची वार्ताहर परिषद होईल. यात राज्यातल्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा होण्याची शक्यता आहे.   

September 19, 2024 1:02 PM

जम्मू काश्मिर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६१ टक्के मतदानाची नोंद

  जम्मू काश्मिर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ३५ वर्षातल्या सर्वाधिक ६१ टक्के मतदानाची नोंद झाली. सर्व २४ मतदारसंघात काल शांततेत मतदान झालं. किश्तवाड जिल्ह्यात सर्वाधिक ८० टक्के मतदानाची नोंद झाली आणि पुलवामामध्ये सर्वात कमी सुमारे ४७ टक्के मतदान झालं.   युवा आणि महिला मतदार मोठ्या संख्येनं या मतदानात सहभागी झाले होते. बहिष्कार आणि दहशतवादाला मतदारांनी मतदान यंत्रातून उत्तर दिल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. जम्मू-काश्मिरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी निवडणूक प्रक्रियेतल्या य...

September 5, 2024 1:24 PM

हरियाणा विधानसभा निवडणुकीची तसंच जम्मूकाश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याची अधिसूचना जारी

केंद्रीय निवडणूक आयोगानं आज जम्मू काश्मीरच्या तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यातल्या निवडणुकीसाठी तसंच हरयाणा विधानसभा निवडणुकीसाठी अधिसूचना जारी केली.   जम्मू काश्मीरचा तिसरा टप्पा आणि हरयाणा विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख १२ सप्टेंबर असून १६ तारखेपर्यंत उमेदवार आपला अर्ज मागे घेऊन शकतील. तर जम्मू काश्मीरच्या दुसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. जम्मू काश्मीर मध्ये १८ सप्टेंबर,   २५ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर अशा तीन टप्प्यात मतदान होणार आहे. दरम्यान निव...

August 31, 2024 7:58 PM

हरियाणा आणि जम्मू काश्मिर विधानसभेसाठी ४ ऐवजी ८ ऑक्टोबरला मतमोजणी

केंद्रीय निवडणूक आयोगानं हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख बदलली असून हरियाणात आता १ ऑक्टोबर ऐवजी ५ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. बिष्णोई समाजाच्या असोज अमावस्या उत्सावामुळे ही तारीख बदलण्यात आल्याचं आयोगानं म्हटलं आहे. अनेक राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांनी ही तारीख बदलण्याची विनंती केली होती. याबरोबरच जम्मू काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आता ४ ऑक्टोबर ऐवजी  ८ ऑक्टोबरला करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. 

August 20, 2024 1:38 PM

जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याची अधिसूचना जारी

जम्मू-काश्मीरच्या विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज निवडणूक आयोगानं आज अधिसूचना  जारी केली. पहिल्या टप्प्यात १८ सप्टेंबरला  मतदान होणार असून त्यात पुलवामा, अनंतनाग, शोपियां, कुलगाम, रामबन, किश्तवाडा आणि डोडा जिल्ह्यांतील २४ विधानसभेच्या जागांचा समावेश आहे. निवडणूक आयोगानं पम्पोर,त्राल,पुलवामा, राजपुरा, जैनापुरा, शोपिया,डी.एच. पोरा, कुलगाम, देवसर, दुरू,कोकेरनाग, अनंतनाग पश्चिम, अनंतनाग, श्री गुफवाडा जीज बेहरा, शांगस-अनंतनाग पूर्व, पहलगाम, इंदरवाल, किश्तवाड, पद्दर-नागसेनी, भदरवाह, डोडा,...

August 17, 2024 10:36 AM

भारत निवडणूक आयोगाकडून राज्यात यावर्षीच्या दुसऱ्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाची घोषणा

महाराष्ट्र राज्यात होणार असलेल्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगानं राज्यात यावर्षीच्या दुसऱ्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाची घोषणा केली आहे. या कार्यक्रमाअंतर्गत पात्र नवमतदारांच्या नोंदणीसह विद्यमान मतदारांसाठी मतदार यादीतील आपल्या तपशीलामध्ये बदल, दुरुस्त्या, अद्ययावतीकरण करता येणार आहे. मतदारांना मतदार यादीतील आपल्या नावासोबतच स्वतःचा मोबाईल क्रमांकही जोडता येणार आहे. यात मतदारांसाठी दावे आणि हरकतींसाठी २० ऑगस्ट २०२४ पर्यंतचा कालावधी निश्चित केला गेला आह...

August 17, 2024 10:35 AM

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राज्यातील काही पक्षांना निवडणूक चिन्हांचं वाटप

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगानं काही पक्षांना निवडणूक चिन्हांचं वाटप केलं. यामध्ये वंचित बहुजन आघाडीला गॅस सिलिंडर तर प्रहार जनशक्ती पक्षाला क्रिकेटची बॅट हे चिन्ह मिळालं आहे.

July 16, 2024 8:09 PM

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रातल्या बर्न्ट मेमरी च्या पडताळणीसाठी प्रमाण कार्यप्रणाली निवडणूक आयोगाकडून जारी

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रातल्या बर्न्ट मेमरी च्या पडताळणीसाठी प्रमाण कार्यप्रणाली निवडणूक आयोगानं आज जारी केली. विधानसभा मतदारसंघातल्या कोणत्याही मतदान केंद्रावरच्या EVM ची निवड आणि कोणत्याही मतदान केंद्रावरच्या बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि VVPAT यांना जोडणाऱ्या कोणत्याही मतदान केंद्रावरच्या मतदान यंत्राची जुळणी आणि सरमिसळ यांचा त्यात समावेश आहे. फर्मवेअरमध्ये लपलेल्या कार्यक्षमतांची कोणतीही भीती, आणि शंकांचं निराकरण या तपासणी आणि पडताळणीतून होतं, अशी खात्री निवडणूक आयोगानं व्यक्त केला आहे.

June 21, 2024 10:20 AM

लोकसभा निवडणूक : ईव्हीएम यंत्राची पडताळणी करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे ८ अर्ज दाखल

२०२४च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या निकाल जाहीर झाल्यानंतर, ईव्हीएम यंत्राची पडताळणी करण्यासाठी काही राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडून निवडणूक आयोगाकडे आठ अर्ज दाखल झाले आहेत. महाराष्ट्रातून अहमदनगर लोकसभा मतदारसंघातले पराभूत उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या अर्जाचाही यात समावेश आहे. तसंच तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, हरियाणा आणि छत्तीसगड मधील उमेदवारांनीही या अंतर्गत अर्ज केले आहेत.   आंध्र प्रदेश आणि ओडिशामधील राज्य विधानसभेच्या निवडणुकांसंदर्भात देखील याच संदर्भात तीन अर्ज प्राप्...