July 26, 2024 1:18 PM

श्रीलंकेच्या राष्ट्रपती पदाची निवडणूक २१ सप्टेंबर रोजी होणार

श्रीलंकेच्या राष्ट्रपती पदाची निवडणूक २१ सप्टेंबर रोजी होणार आहे. श्रीलंकेच्या निवडणूक आयोगानं १५ ऑगस्टपर्यंत यासाठी अर्ज मागवले आहेत. २०१८ मध्ये झालेल्या निवडणुकीत गोटाबाया राजपक्षे ५ लाख मतांनी विजयी झाले होते. मात्र त्यानंतर आलेल्या आर्थिक आणि राजकीय संकटामुळं त्यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर उर्वरित कालावधीसाठी संसदेनं रानिल विक्रमसिंघे यांना राष्ट्रपतीपदासाठी निवडून दिलं होतं.

July 1, 2024 1:45 PM

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ४ जागांसाठीच्या निवडणुकीच्या मतमोजणीला प्रारंभ

महाराष्ट्र विधान परिषदेच्या ४ मतदारसंघातल्या निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी सुरु झाली. कोकण पदवीधर, मुंबई पदवीधर आणि मुंबई शिक्षक मतदारसंघ या तीन मतदार संघांची मतमोजणी नवीमुंबईत नेरुळ इथं होत असून मतपत्रिकांची प्राथमिक मोजणी पूर्ण झाली आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणीही आज होत आहे. जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा इथं मतमोजणी सुरू असताना एका मतदान केंद्रावर तीन मतपत्रिका जास्त निघाल्यानं गोंधळ उडाला. त्यामुळे संबंधित केंद्रावरची मतमोजणी स्थगित झाली आहे.

July 1, 2024 9:00 AM

विधानपरिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर तसंच नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची आज मतमोजणी

विधान परिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर तसंच नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघांसाठी झालेल्या मतदानाची आज मोजणी होणार आहे. नाशिक शिक्षक मतदार संघाची मतमोजणी नाशिक शहरात केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामात होणार आहे. नाशिकचे विभागीय आयुक्त प्रविण गेडाम यांनी काल याठिकाणी पाहणी करुन तयारीचा आढावा घेतला.

June 29, 2024 10:30 AM

मंगोलियात सत्ताधारी पक्ष मंगोलियन पीपल्स पार्टीनं संसदीय निवडणुकीत विजय

मंगोलियात सत्ताधारी पक्ष मंगोलियन पीपल्स पार्टीनं संसदीय निवडणुकीत विजय मिळवला आहे. प्रारंभिक निकालांनुसार १२६ पैकी किमान ६८ जागा आपल्या पक्षाला मिळाल्या आहेत, असं पक्षाचे अध्यक्ष आणि पंतप्रधान ओयन एर्देन लुसानमस्राई यांनी वार्ताहरांना सांगितलं. कागदी मतपत्रिकांची मोजणी झाल्यानंतर निवडणुकीचे अधिकृत निकाल जाहीर होतील. मंगोलियामध्ये संसदेचं एकच प्रतिनिधीगृह आहे.