September 17, 2024 10:08 AM

जागतिक कृषी मंचातर्फे पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्र यासाठी राज्य सरकारनं केलेल्या कामाची दखल

जागतिक कृषी मंचातर्फे पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्र यासाठी राज्य सरकारनं केलेल्या कामाची दखल घेण्यात आली आहे. या कामगिरीसाठी उद्या जागतिक बांबू दिनाचं औचित्य साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सन्मान केला जाणार आहे. मुंबईत होणाऱ्या या कार्यक्रमाला 20 देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. पर्यावरण रक्षणासाठी त्वरीत कृतीची साद संयुक्त राष्ट्रांनी दिली होती. त्याला प्रतिसाद देणारा भारत हा पहिलाच देश ठरला असून महाराष्ट्...

July 14, 2024 8:14 PM

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरातल्या नियोजनाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पंढरपुरात आषाढी एकादशीच्या अनुषंगाने पूर्वतयारीचा आढावा घेऊन सोई-सुविधांची पाहणी केली. वारीमध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता भासू दिली जाणार नाही, वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. या वर्षी पंढरपुरात स्वच्छता व्यवस्था चांगली आहे असं सांगून नदी स्वच्छता आणि वाळवंट स्वच्छतेबाबत मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या. मुख्यमंत्र्यांनी करकंब इथं श्री संत निळोबाराया पालखीचं दर्शन घेतलं आणि पालखीसोबत काही वेळ पायी प्रवास केला. या...

June 29, 2024 7:18 PM

सर्वधर्मीयांच्या तीर्थक्षेत्रांसाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना लागू करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

सर्वधर्मीयांच्या तीर्थक्षेत्रांसाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना लागू करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिलं. तातडीनं अंमलबजावणी करण्यासाठी, लवकरच नियमावली तयार करून इच्छुकांकडून ऑनलाईन अर्ज मागवू, असं ते म्हणाले. आमदार प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भातली लक्षवेधी सूचना मांडली होती.  

June 16, 2024 8:47 PM

विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा – मुख्यमंत्री शिंदे

पूर्ण ताकतीनं विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा असे, निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या नेते आणि कार्यकर्त्यांना दिले आहेत. पक्षाच्या ५८ व्या वर्धापनदिनाच्या तयारीच्या अनुषंगानं आज पक्षाचे सर्व नेते, मंत्री, आमदार आणि पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक त्यांनी आज मुंबईत घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

June 16, 2024 3:26 PM

राज्यशासन अधिकारी महासंघाच्या मागण्यांबद्दल राज्यशासन सकारात्मक – एकनाथ शिंदे

  राज्यशासन अधिकारी महासंघाच्या मागण्यांबद्दल राज्यशासन सकारात्मक असून त्याबद्दल लवकर निर्णय घेतला जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याची माहिती अधिकारी महासंघाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.   सेवानिवृत्तीचं वय साठ वर्षे करावं, केंद्राच्या धर्तीवर महागाई भत्त्यात वाढ, अतिरिक्त सचिव पदाची निर्मिती तसंच रिक्त पदांची भरती, सुधारित सेवानिवृत्तीची अधिसूचना काढावी इत्यादी महासंघाच्या मागण्या आहेत. आचारसंहितेमुळे प्रलंबित राहिलेल्या या मागण्यांवर तातडीनं निर्णय घेण्यासाठी मुख...

June 15, 2024 1:21 PM

आषाढी वारीत सहभागी दिंड्यांना २० हजार रुपये अनुदान

पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या दिंड्याना वीस हजार रुपयांचं अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.  पालखी सोहळ्याच्या नियोजनासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल मुंबईत झालेल्या  बैठकीत ते बोलत होते.   वारकऱ्यांसाठी गटविमा योजना, पथकर माफी या सुविधा उपलब्ध असतील, असं ते म्हणाले.  पालखी मार्गाची दुरूस्ती, जास्तीच्या एस टी  गाड्या, पिण्याचं शुद्ध पाणी, दर्शन मंडपात हवेशीर व्यवस्था, महिलांसाठी कपडे बदलण्यासाठीची...