September 24, 2024 1:08 PM

जपानला ५.९ रिक्टर क्षमतेच्या भूकंपाचा धक्का

जपानला आज सकाळी सव्वा आठ वाजता ५ पूर्णांक ९ रिक्टर क्षमतेच्या भूकंपाचा धक्का बसला त्यानंतर टोकियोच्या दक्षिणेकडच्या बेटांवर ५० सेंटीमीटर ऊंचीच्या त्सुनामीच्या लाटा आदळल्या.या भूकंपाचा केंद्रबिंदू पॅसिफिक महासागरात सुमारे १० किलोमीटर अंतरावर असलेल्या इझू बेट साखळीतल्या तोरिशिमाजवळ होता. भूकंपाच्या केंद्रापासून अंदाजे १८० किलोमीटर अंतरावर असलेल्या हाचिजो बेटावर ५० सेंटीमीटर आणि मियाके बेटावर१० सेंटीमीटर त्सुनामी लाटांची नोंद झाली.

August 29, 2024 3:54 PM

दिल्लीत सकाळी भूकंपाचे धक्के

दिल्ली राजधानी क्षेत्रात आज सकाळी ११ वाजून २६ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. रिक्टर मापकावर त्याची तीव्रता ५ पूर्णांक ७ दशांश इतकी नोंदली गेली. भूकंपात जीवितहानी किंवा वित्तहानी झालेली नाही.

August 27, 2024 1:54 PM

बिहारच्या भागलपूर आणि आजूबाजूच्या परिसरात भूकंपाचे धक्के

बिहारच्या भागलपूर आणि आजूबाजूच्या परिसरात काल मध्यरात्री भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ४.५ मोजण्यात आली. भूकंपाचे केंद्र झारखंडच्या संधाल प्रांतातल्या रामगढ जिल्ह्यात होतं. या भूंकपात कोणतेही नुकसान झाल्याचं वृत्त नाही.

August 18, 2024 1:15 PM

रशियाच्या पूर्व किनाऱ्याला 7 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

रशियाच्या पूर्व किनाऱ्याला आज ७ रिक्टर क्षमतेच्या भूकंपाचा धक्का बसला. भूकंपाचा केंद्रबिंदू पेट्रोपाव्लोवस्क- कामशाकी शहरात ४८ किलोमीटर खोलीवर होता. भूकंपाच्या केंद्रबिंदूपासून तीनशे किलोमीटरच्या भागात त्सुनामी येण्याचा इशारा अमेरिकेच्या हवामान खात्यानं दिला होता. मात्र नंतर विभागाने ही शक्यता नाकारली.

August 8, 2024 8:26 PM

जपानच्या नैऋत्य भागात ७.१ रिक्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

जपानच्या नैऋत्य भागात आज ७ पूर्णांक १ दशांश रिक्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. यात कोणतीही जीवितहानी किंवा नुकसान झाल्याचं वृत्त नाही. जपानच्या हवामान विभागानं मियाझाकी, कोची, ओटा, कागोशिमा आणि एहिम प्रीफेक्चर्सच्या किनारी भागांत सुनामीचा इशारा दिला आहे.

July 11, 2024 8:42 PM

फिलिपाइन्समधील सुलतान कुदारात प्रांतात ७.० तीव्रतेचा भूकंप

दक्षिण फिलिपिन्सच्या सुलतान कुदरत प्रांतांत आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ७ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का  बसला, अशी माहिती फिलिपिन्सच्या भूकंपमापन आणि ज्वालामुखी शास्त्र  संस्थेनं दिली आहे. फिलिपिन्सच्या किनारी भागापासून नैऋत्येला १३३ किलोमीटरवर आणि  भूगर्भाखाली ७२२ किलोमीटरच्या आसपास भूकंपाचं केंद्र  होतं. प्रशांत महासागराभोवतालच्या भूकंपप्रवण क्षेत्रात हा भाग येत असल्यानं इथं वारंवार भूकंपाचे धक्के बसतात, मात्र यामुळे कोणतीही जीवितहानी किंवा त्सुनामी येण्याची शक्यता नाही, अशी माहि...

July 10, 2024 1:49 PM

मराठवाडा आणि विदर्भात पहाटे भूकंपाचे धक्के

महाराष्ट्रातल्या मराठवाडा आणि विदर्भातल्या काही जिल्ह्यांना आज सकाळी ७ वाजून १६ मिनिटांनी भूकंपाचे धक्के बसले. भूकंपाची तीव्रता साडेचार रिक्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. भूकंपाचा केंद्रबिंदू मराठवाड्यातल्या हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यातल्या रामेश्वर तांडा गावात होता. भूकंपामुळे कोणतीही जिवीत अथवा वित्त हानी झालेली नाही. मराठवाड्यातल्या नांदेड, परभणी आणि हिंगोली तर विदर्भातल्या वाशिम इथंही भूकंपाचे धक्के जाणवले. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्कता बाळगावी, असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं ...